शेनवडीचा तलाठी लाच प्रकरणी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
शेनवडीचा तलाठी लाच प्रकरणी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफार मध्ये नावांची नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाचेची मागणी करून ९००० रूपये प्रत्यक्ष स्विकारताना शेनवडी तालुका माण येथील तलाठी तुकाराम शामराव नरळे ,वय ३०, राहणार पानवण तालुका माण यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, महिला तक्रारदार यांच्या चुलत सासरे यांच्या शेनवडी तालुका माण येथील साडेतेरा एकर जमिनीचा म्हसवड येथील न्यायालयात हुकुमनामा आदेश होऊन साडेतेरा एकर जमीन तक्रारदार यांच्या पती व दिराचे नावावर करण्यासाठी आदेश न्यायालयाने दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानुसार जमिनीच्या फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी शेनवडीचा तलाठी शामराव नरळे यांनी तक्रारदार यांच्या कडे ११०००रूपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती तक्रारदार यांनी ९०००रूपये देण्याचे कबूल केले. व त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पथकाने तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. ढोर कारखान्यानजीक ९०००रूपयांची लाच स्वीकारताना तलाठी नरळे यास पकडण्यात आले. हा पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश चव्हाण, प्रशांत नलवडे, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी केला. शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांनी कोणतेही शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त जादा पैसे मागितले तर नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन उप अधीक्षक उज्वल वैद्य यांनी केले आहे
Comments
Post a Comment