अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
रिसोड : एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःचे शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान रिसोड सेनगाव मार्गावर ग्रामीण रुग्णालयासमोर उघडकीस आली. राहुल विश्वनाथ इंगोले वय 15 वर्षे असे मृतकाचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अशी की सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अंतर्गत येत असलेल्या चीकमाहोत या ठिकाणी राहणाऱ्या काही परिवार भिक्षा मागण्याकरिता गावोगावी फिरत असतात राहुल.राहुल आपल्या परिवारासोबत वाशीमहून दिनांक 24 सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यात दाखल झाला होता.रिसोड शहरातील वाशिम मार्गावर सर्व परिवारांनी पाल मांडून छत्रपती शिवाजीनगर भागात आपला मुक्काम ठोकला होता.काल 25 रोजी रात्री राहुल काही न सांगता बाहेर निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नसल्याने त्याचा शोध घेणे सुरू केले होते. आज सकाळी ग्रामीण रुग्णालयासमोर इलेक्ट्रिक विद्युत वाकलेल्या खांबाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
Comments
Post a Comment