आभाळ फाटलं पण संत बाळूमामानीच सुई दोरा घेऊन पाठवलं आदमापूर - संत श्री बाळूमामा मंदिरात हजेरी पुस्तक स्टॉक बुक नोंदणी ते दिशादर्शक फलक.
आभाळ फाटलं पण संत बाळूमामानीच सुई दोरा घेऊन पाठवलं आदमापूर - संत श्री बाळूमामा मंदिरात हजेरी पुस्तक स्टॉक बुक नोंदणी ते दिशादर्शक फलक.
---------------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
राजू मकोटे
---------------------------------------------
स्टॉक बुक नोंदणी ते दिशादर्शक फलक - सोशल मिडियासह ऑनलाईन दर्शन सुविधा साठी-प्रशासक शिवराज नाईकवडे कडून सुरुवात
कोल्हापूर ( राजेद्र मकोटे )- विदर्भ - मराठवडया पासून उभ्या - आडव्या महाराष्ट्रा सह थेट गोवा - कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे अत्यंत मनस्वी श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी कागल भुदरगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आदमापूर गावातील संत श्री बाळूमामा मंदिराचा कारभार हातात भाविकांच्या श्रद्धेचा पुरेपूर लाभ उठवत संस्थानिक बनलेल्या संचालकांच्या तीव्र अंतर्गत मतभेदामुळे व परस्पर विरोधी तक्रारी मुळे आणि या संचालकाच्या बैठकीतच थेट चपलाने मारहाण करण्यापर्यंतच्या झालेल्या प्रकाराने या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आला .आणि धर्मादायक आयुक्त कार्याकडून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये काम करत आपल्या सर्व समावेशक कार्याचा ठसा उमटवलेले शिवराज नाईकवाडे यांची दोन सह सहकाऱ्यांसह या ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली . त्यांनी प्रशासक म्हणून सूत्रे हद्दी घेतल्यानंतर पाहणी करत असताना किमान गोष्टीचीही परिपूर्ती नसलेल्या आणि मात्र कोट्यावधी रुपयाची उलाढालीच्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामाच्या या आदमापूर येथील मुख्यालयातील अनेक अनपेक्षित गोष्टी आणि कालबाह्यप्रताप त्यांच्यासमोर आल्या येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे किमान हजेरी बुक नसणे देवस्थानकडे जमा असलेल्या वाहनांचीरीतसर नोंद नसणे देवस्थाने खरेदी केलेल्या जमिनीची प्रशासकीय पुरेपूर नोंद झालेली नसणे देवस्थान मुख्यालय परिसरात वाहनतळासाठी घेतलेल्या जागेची खुद्द भाविकांना माहिती नसल्याने प्रति महिना अमावस्येसह नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रमा वेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होणे देवस्थानकडे मिळालेल्या वस्तूंची किमान नोंद नसणेदेवस्थानच्या आधुनिकइंटरनेट सुसज्ज असलेला दवाखाना योग्य नियोजन आणि मनुष्यबळावी पूर्ण क्षमतेने चालू नसणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गात आपल्याच किमान जबाबदारीची जाणीव नसणे ही यादी फारच प्रचंड मोठी प्रमाणात होती आणि अध्यापी आहे मात्र ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात आपल्या अनुभवावर आधारित करत हे ' अवास्तव बदलण्यासाठी 'खुद्द बाळूमामांनी आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे ' अशा भूमिकेतून प्रशासक शिवराज नाईकवाडी आपल्या सहकार्यासमवेत कार्यरत झाले आहेत आणि कोणाचेही भीडभाड न ठेवता प्रसंगी कठोर निर्णय घेत त्यांनी ही परिस्थिती सुधारण्या चा चंगच बांधला आहे . आणि त्याची सकारात्मक झलक प्रशासकीय पहिल्या चार महिन्यात देवस्थानला मिळालेल्या ९ कोटी २ लाख रुपये उत्पन्नातून दिसून आली आहे. श्री बाळूमामा मंदिरातील एकूणच कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरु झाला असून मंदिरा परिसरातील सर्व दानपेट्या कुलपबंद करण्यात आल्या आहेत. मंदिरातील सर्व आर्थिक व्यवहार हे पारदर्शिपणे होण्यासाठी ते आता ‘धनादेशा’च्या माध्यमातून करण्यात येत आहेत. यासह श्रध्दाशील भाविकांना विविध सेवा - सुविधा देणे हाच केंद्रीय प्राधान्य दृष्टीकोन ठेवून प्रशासन कार्यरत करण्यासाठी प्रशासक ' टिम नायकवडे ' सुसज्ज झालेली आहे , त्यांनी प्रांरभीच केलेल्या भाविक केंद्रीत सुधारणाची ही काही उदाहरणे अशी - भाविकांना कमी वेळेत दर्शन सुलभ व्हावे म्हणून आता मुखदर्शनाच्या दोन रांगा केल्या आहेत. मंदिराचे फेसबुक, इंस्टाग्राम - ट्विटर अकाऊंट चालू केले असून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराप्रमाणे संत श्री बाळूमामा मंदिरात २४ तास ‘ऑनलाईन’ दर्शन चालू करण्यात येणार आहे , त्या साठी बी एस एन एल - जिओ - एअरटेल - आयडिया चे वरिष्ठ प्रतिनिधी स्वतः येऊन भेटत आहेत .
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिवपद सांभाळल्यामुळे तेथील अनुभव ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे . त्यापेक्षा किमान तिप्पट आर्थिक उलाढाल अशी फार मोठ्या कार्यक्षेत्रात यांच्या आजवरच्या अनुभवा चा कस लागत आहे . संत बाळूमामा हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे उत्पन्न असणारे मंदिर असून अमावास्या-पौर्णिमेला २-३ लाखांच्या वर भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना प्रसाद, वाहतनतळ यांपासून ज्या ज्या सुविधाअधिक अधिक सुविधा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कटाक्षाने कल आहे .नेहमी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवस्थान परिसरात असलेल्या वाहन तळाच्या जागांमध्ये योग्य समन्वय ठेवणे त्याची माहिती देणारे बोर्ड सर्वत्र लावणे या कामास प्राधान्य देण्यात आले आहेकोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व आदमापुर कडे दर्शनासाठी येत आसलेल्या भाविकांसाठी पुणे बेंगलोर महामार्गापासून कागल - निपाणी - कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावर विशिष्ठ रंग संगती मध्ये रस्या कडेला - वळणावर मोठे बोर्डे - होर्डींग लावले जात आहेत .
सध्या मंदिरात सकाळ आणि सायंकाळ २ घंटे विनामूल्य प्रसाद देण्याची सुविधा आहे. प्रसादात भात, आमटी, भात, खीर यांचा समावेश असून या प्रसादाच्या माध्यमातून आणखी चांगली कशी सुविधा देता येईल यांसाठी प्रयत्न सुरु आहेत.यासाठी शिर्डी तसेच शेगाव देवस्थान सह इतर ठिकाणी आपल्या महाप्रसाद व्यवस्थित आहे तुलनात्मक अभ्यास केला जात असून तेथे कार्यरत असलेल्या कडून मार्गदर्शन आणि सल्ला ही घेतला जात आहे .
मंदिरात गर्दी च्या वेळी काही चोरट्यां टोळया कडून महिला भाविकांचे दागिने चोरण्याचा प्रकार होत असत , श्रद्धाशील भाविक आपल्या देवस्थान ची बदनामी होवू नये यासाठी साधी तक्रार ही नोंदवत नसत मात्र मंदिरात सुरक्षा यंत्रणेसह ‘सी.सी.टि.व्ही.’ बसवल्यावर हा प्रकार जवळपास बंद झाला आहे.लवकरच मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी ही सुरू केली जाणार आहे
संत श्री बाळूमामा देवस्थानच्या बकर्याही मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, हिंगोली, जालना या ठिकाणी या बकर्या आहेत. १८ तळांवर साधारणत: ३० ते ३२ सहस्र बकर्या देवस्थानच्या मालकीच्या आहेत.या ठिकाणी जमा होत असलेल्या देणगी पेट्याना प्रथमच कुलूप बंद करण्यात आल्याने मुख्यालया जमा होणाऱ्या मार्गातील निधीमध्येही प्रचंड लाखो रुपयात वाढ झाली आहे
आदमापूरास येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कागल-निढोरी, निपाणी-मुरगुड, मुदाळतिठ्ठा-गारगोटी यांसह मंदिराकडे येणार्या मार्गावर आम्ही देवस्थानकडे जाणारे दिशादर्शक फलक लावले आहेत. यात कर्नाटक राज्यातून येणारे भाविकांसाठी संत बाळूमामाच्याचित्रासह भव्य फलक लावण्यात आले आहेत
मोठ्या संख्येने भाविक आल्याने भाविकांना लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशी अमावास्येला स्थिती असते. त्यासाठी जागा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंदिराच्या परिसरातील लवकरच काही जागा आमच्या कह्यात येईल. ती आल्यावर पुढील काळात एकही वाहन रस्त्यावर न थांबता विनामूल्य असलेल्या देवस्थानच्या वाहनतळावर थांबेलअसे नियोजन करण्यात येणार आहे
संत बाळूमामा यांच्यासाठी भाविक जे धोतर, सदरा, फेटा अर्पण करतात ते वस्रप्रसाद केंद्राच्या माध्यमातून आम्ही भाविकांना परत देतो. देवस्थानच्या वतीने शुद्ध खोबरेल तेल देण्याची व्यवस्था असून या माध्यमातूनही भाविकांचा लाभ देण्याचे भावी काळात नियोजन आहे.मंदिर परिसरात अत्यंत दर्जाहीन असे खोबरेल तेल बाळूमामाच्या नावाने दिले जाते भाविक येथे सध्या कुठे घेतात मात्र यावर कोणतेही नियंत्रण सध्या तरी नाही यासंदर्भात आम्ही अन्न नागरी पुरवठा करण्याची सातत्याने संपर्कात आहोत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे त्याचबरोबर तिने मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या रस्त्याचे मधील खड्डे मुजण्यासाठी व झ तर मंजूर कामासाठी संबंधित ठेकेदार व पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे .
तमाम भक्त केद्रीत विविध आगामी योजना चेही
सध्या लाडूप्रसाद बंद असून लवकरच भाविकांसाठी आम्ही लाडू प्रसाद उपलब्ध करून देणार आहोत. जे भाविक ५०० रुपयांच्या पुढची पावती करतील त्यांना विनामूल्य लाडू प्रसाद देण्याचा आमचा विचार आहे.
मंदिराचे सुसज्ज असे रुग्णालय सध्या बंद झाले ली राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना ' ही सुविधा चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.तसेच या ठिकाणी विविध नामवंत डॉक्टरांची सेवा सुरू करूनमहानगर दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे .
सध्या भक्तनिवासात १२० खोल्या आहेत. येणार्या भाविकांचा ओघ पहाता ही व्यवस्था खूपच अपुरी असून आणखी २ भक्तनिवास प्रस्तावित आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी सह विविध संस्था ही तयार आहेत या कामा सही लवकरच गती येणार आहे
या मंदिराचे विशेष म्हणजे हे मंदिर २४ तास भाविकांसाठी खुले असते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सह श्री महालक्ष्मी देवी - दख्खन चा राजा जोतिबा - त्र्यैबोली देवस्थान परिसरा तील विविध सेवा सुविधा निर्माण करण्यात , त्यांच्या च आर्शिवादाने काही प्रमाणात यश आले . याच भावनेतून आता संत श्री बाळूमामा यांच्या कृपा छत्र खाली आदमापूर परिसरात महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध प्रशासकीय काम - भाविकाच्या भावनाची कदर करत कार्यरत देवस्थान म्हणून विकसित करण्यासाठी ची संधी आपणास लाभली आहे या श्रद्धेने शिवराज प्रशासक शिवराज नाईकवाडे आपल्या सहकार्यासमवेत कार्य झालेली आहेत आणि भाविकांना ज्या सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे, त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रामाणिक - पारदर्शी पणे कठोर निर्णय घेत सक्रीय झाले आहेत. त्यामुळे तमाम भाविकांची आता या ठिकाणी होत असलेल्या सेवा सुविधा पाहून फाटलेल्या आभाळाला भक्कम टाके करण्यासाठी बाळूमामाचे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असल्याची भावना बळकट होत आहे .
Comments
Post a Comment