जावली तालुक्यात सर्व ग्रामपचांयत मध्ये राबविणेत येणार "स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा 2023" अंतर्गत दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तास स्वच्छता उपक्रम.
जावली तालुक्यात सर्व ग्रामपचांयत मध्ये राबविणेत येणार "स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा 2023" अंतर्गत दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तास स्वच्छता उपक्रम.
दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते दि. 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा 2023 हा उपक्रम राबविण्यात येत असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता एक तारीख एक घंटा (एक तारीख एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठया प्रमाणावर जावली विकास गटामधील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविणेचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमांची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे.
• दि. 1/10/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हयातील ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक वॉर्ड / ग्रामपंचायतीमध्ये 1 तास श्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येईल. सदर उपक्रमात ग्रामस्थाव्दारे प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात येईल. सदर स्वच्छता उपक्रमाचा दृष्य परिणाम दिसणे आवश्यक आहे.
सदर उपक्रम राबविण्याकरिता वॉर्ड / ग्रामपंचायती अंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, विमानतळ, राष्ट्रीय / राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, जलस्त्रोत, नदीघाट, झोपडपट्टया, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्राहालय, गो-शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, रहिवासी क्षेत्र, आरोग्य संस्था, आसपासचा परिसर, अंगणवाडी परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर तसेच सदर क्षेत्रातील महत्वाचे ठिकाण अशा ठिकाणांची निवड करण्यात यावी.
. सदर उपक्रमाकरिता वॉर्ड/ ग्रामपंचायत हे एक भौगोलिक एकक समजण्यात यावे. प्रत्येक वॉर्डत दोन ठिकाणी तर प्रत्येक ग्रामपंचायतीचे एका ठिकाणी उपक्रम राबविण्यात यावेत. ज्या वॉर्डची लोकसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एकापेक्षा अधिक वॉर्डसाठी सदर उपक्रम राबविण्यात यावे.सदर उपक्रमाकरिता महिला बचतगट, युवा मंडळे, सहाय्यकारी संस्था (NGO), ग्रामस्तरावरील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवरांना निमंत्रीत करण्यात यावे.
सदर स्वच्छता उपक्रमाकरिता आवश्यक असलेले झाडू, केर भरणी, कचरा पेटया, थैल्या इत्यादी साहित्यांची व्यवस्था करण्यात यावी. स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी तालुका, व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांनी
कचरा न करणेबाबत प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
सर्व ग्रामपंचायतींनी दि.2/10/2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त प्रभातफेरी, रांगोळी, तसेच सफाई मित्राचा सत्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे वरील कार्यक्रमाबाबत सातारा जिल्हा परिषदेचे आदरणीय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.ज्ञानेश्वर खिलारी(भा.प्र.से) ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.महादेव घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पाणी व स्वच्छता विभाग)मा.श्रीमती क्रांती बोराटे ,पंचायत समिती जावली चे गटविकास अधिकारी मा.श्री.मनोज जी भोसले तसेच पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री.सुरवसे ,श्री.पवेकर , श्री. धनावडे ,श्री. देशमुख यांनी या विकास गटातील सर्व ग्रामसेवकांना या कार्यक्रमाबाबतचे मार्गदर्शन केलेले आहे
Comments
Post a Comment