जुगार खेळणाऱ्या वाईमधील सहा जणांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ७४६०५रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
जुगार खेळणाऱ्या वाईमधील सहा जणांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ७४६०५रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. वाई येथील वाई शेलारवाडी रस्त्यावर सुभाष पाटणे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली बरेच दिवसांपासून तिनं पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून सहा जणांवर कारवाई केली व याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातुन जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, दुचाकी, आणि मोबाईल असा सुमारे ७४६०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी दिनांक २७ रोजी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे विभागाने माहिती दिली. सुभाष भिकु आरडे ,वय ५३, शिवाजी वसंत शिंदे,वय ५६, अंकुश गणपत जाधव,वय ६९, उमेश दत्तात्रय मोरे,वय ५६, संजय बबन भोसले ,४९, राहणार सर्व गंगापुरी तालुका वाई,व भिमराव किसन सपकाळ,वय ५६, राहणार रविवार पेठ,वाई अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांन...