गांधीनगर ग्रामपंचायतीने अन्यायकारक, अवाजवी पाणीपट्टी कमी करावी : चंदवाणी

 गांधीनगर ग्रामपंचायतीने अन्यायकारक, अवाजवी पाणीपट्टी कमी करावी : चंदवाणी

गांधीनगर : ग्रामस्थांना न परवडणारी, अवाजवी अतिरिक्त पाणीपट्टी कमी करा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रताप चंदवानी यांनी गांधीनगर ग्रामपंचायतीकडे केली असून शुक्रवारी (दि.२५) होणाऱ्या गावसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन चंदवानी यांनी ग्रामपंचायत प्रशासनास दिले आहे.#

चंदवानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामस्थांवर पाणीपट्टीचा नाहक बोजा पडत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १२०४२८५५ रुपये इतकी पाणीपट्टीची येणे रक्कम होती. यापैकी ५७४५००८ रुपये इतकी वसुली झाली. म्हणजे ६२९७८४७ रुपये इतकी रक्कम आर्थिक वर्षात शिल्लक राहिली. ही शिल्लक रक्कम व २०२३-२०२४ यावर्षी वसुली होणारी पाणीपट्टीची एकूण रक्कम ७३८६६०० रुपये होते. म्हणजे १३६८४४४७ इतके पाणीपट्टीतून एकूण उत्पन्न मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाचा एकूण खर्च ५५३८०२६ रुपये इतका अपेक्षित आहे. म्हणजे ८१४६४२१ रुपये इतकी पाणीपट्टी शिल्लक राहणार आहे.#

जर पाणीपट्टी शिल्लक राहणार असेल तर जी  ५०० रुपये पाणीपट्टी अतिरिक्त वाढवली आहे ती कमी करण्यात यावी. जी पाचशे रुपयांची अतिरिक्त पाणीपट्टी वाढवली आहे तिचा ठराव १९-४-२०२२ रोजीच्या मासिक सभेमध्ये करण्यात आला आहे. कायदेशीरदृष्ट्या या वाढीचा गावसभेमध्ये ठराव मंजूर होणे जरुरी होते. पण हा ठराव मासिक सभेत मंजूर करून घेतला, ते सारासार चुकीचे आहे. त्यातच सद्यस्थितीत ग्रामस्थांचे आर्थिक बजेट अगोदरच कोलमडले असताना अतिरिक्त पाणीपट्टीचा भार ग्रामस्थांवर देणे अन्यायकारक आहे. ही अतिरिक्त वाढ गावसभेत ठराव करून कमी करावी.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.