बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अक्षय भोसले यांचेवर गुन्हा दाखल.
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अक्षय भोसले यांचेवर गुन्हा दाखल.
दिनांक 27 ऑगस्ट रोजी मोळाचा ओढा परिसरात निकी बंटी हाॅटेल समोर सातारा येथे बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अक्षय भोसले,वय 32, राहणार गणेश काॅलनी तामजाई नगर सातारा यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस आनंद चव्हाण यांनी ताब्यात घेतले. व गुन्हा भारतीय हत्यार अधिनियम कलम 3, ( 1,25) अन्वये गुन्हा दाखल केला असून अक्षय भोसले याचेकडुन 65000 रुपये किंमतीची पिस्तुल जप्त केली. पुढील तपास पीएसआय फरांदे करीत आहेत.
Comments
Post a Comment