मैद्याच्या मालाचा अपहरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश.

 मैद्याच्या मालाचा अपहरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश.

सातारा येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत उन साहित्य घेऊन कर्नाटक राज्यात पोहचविणे असताना  दुसरीकडे अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी आंतरराष्ट्रीय असून तिघांना अटक करून त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विजय सिददापा दलवाई,वय 32, सतीश चंद्रशेखर गौडापाटील,वय28, दोघे राहणार कर्नाटक, मेघराज शशिकांत सावेकर,31, राहणार अतित तालुका सातारा अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर घटना दिनांक 2 ऑगस्ट रोजी घडली आहे. सातारा एम.आय.डी.सी.मधील एफ आणि के कंपनीला मैदा व सुदीप विजापूर , कर्नाटक येथे पोहोचवायचे होते. यासाठी  ट्रान्सपोर्टदवारे आलेल्या ट्रक चालकाने साहित्य घेतले. मात्र ते विजापूर येथे पोहोच न झाल्याने कंपनीच्या लक्षात आले. त्यानंतर कंपनीने पाठपुरावा केला पण फसवणूक झाल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सातारा शहर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर काही महत्वाची माहिती मिळाली. त्यानुसार तपास गतिमान केल्यावर काही जणांची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांची पोलिसांनी उचलबांगडी केल्यावर फसवणूक केली असल्याचे कबूल केले. ट्रक चालकाने बनावट नंबर व बनावट कागदपत्रे तयार करून ‌कंपनीकडुन लाखो रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला मात्र तो पोहोच न करता अपहार केला. पोलीसांनी संशयिताकडुन रोख रक्कम 6,67,000 व ट्रक रूपये 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, यांच्या सुचनेनुसार पोलिस हवालदार सुजित भोसले, पोलिस नाईक निलेश जाधव, पंकज मोहिते, पोलिस काॅ , संतोष कचरे, गणेश घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी कारवाई केली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.