चिमगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ...

 चिमगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ...


---------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------

चिमगाव, (ता. कागल) महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या प्रयत्नातून विठ्ठल मंदिर महाप्रसादाचे हॉलचे पायाभरणी व  दोन अंगणवाडी पायाभरणी शुभारंभ सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते संपन्न झाले.

या शुभारंभ प्रसंगी नविद मुश्रीफ म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. भविष्यात सरपंच आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जी विकासाची अपूर्ण राहिलेली कामे आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


          यावेळी सरपंच दिपक आंगज, उपसरपंच आनंदा चौगले, सागर भोई, आनंदा करडे, कविता करडे, संगिता फराकटे, अस्मिता चौगले, संजय एकल, सोनाली मांगले, रेश्मा नाईक, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, बी.एम.पाटील, तानाजी एकल, साताप्पा आंगज, राजेंद्र एकल, संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी वर्ग व वारकरी विठ्ठल भजनी मंडळचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.