उंचगाव व तावडे हॉटेल येथील उड्डाण पुलाची उंची वाढवावी एम.आय.डी.सी.ला जोडणारे सेवा रस्ता दुतर्फा मध्येच खंडीत न करता पुर्ण करा-राजू यादव.

 उंचगाव व तावडे हॉटेल येथील उड्डाण पुलाची उंची वाढवावी  एम.आय.डी.सी.ला जोडणारे सेवा रस्ता दुतर्फा मध्येच खंडीत न करता पुर्ण करा-राजू यादव.

पुणे बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरण अर्थात विस्तारिकरण सुरू आहे. हे सुरू असताना उंचगाव उड्डाणपुल व तावडे हॉटेल जवळील हायवे उड्डाणपुलाचे उंची वाढवण्यात यावी. सध्या या उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने वाहन धारकांना वाहतुकीच्या कोंडीचा फटका तर बसतोच इंधनही वाया जाते. वेळेचा अपव्यय होतो. एखादया गंभीर रूग्णाला ताबाडतोब रूग्णालयात दाखल करण्यास घेवून जाताना येथील वाहतुकीच्या कोंडीचा नेहमीच त्रास होतो. त्यामुळे तावडे हॉटेल उड्डाण पुलाची उंची आता म्हणजे महामार्गाची विस्तारिकरण सुरू असताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाढवली पाहिजे शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहत, पंचतारांकित एम.आय.डी.सी. कागल, हुपरी चांदी बाजारपेठ, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगन्य गांधीनगर बाजारपेठ येथे हजारो वाहन

धारक ये-जा करत असतात उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने तेथे वाहतुकीची कोडी नित्याची बाब आहे. कधी तेथे पोलीस असतात कधी ते नसतात त्यामुळे याठिकाणी जी वाहतुकीची कोंडी होते त्याचा

फटका एम.आय.डी.सी. मधील कामगार सरकारी नोकर, बाजारपेठेत सेवा बजावणारे कर्मचारी आणि विशेषतः महिला वर्गास बसतो. याकरीता दोन्ही उड्डाण पुलाची उंची वाढविण्यात यावी सध्या महामार्गावर सेवा रस्ते खंडीत झाले आहे. त्यामुळे सरनोबतवाडीकडून उंचगांवला येताना अनेक अपघात झाले आहेत त्यात काही जणांचा बळीही गेला आहे. तसेच एम.आय.डी.सी.मध्ये गोकुळ शिरगांव असेल,

किंवा पंचताराकिंत ५ स्टार एम.आय.डी.सी. असेल किंवा शिरोली एम.आय.डी.सी. येथे कामावर जाणारा कर्मचारी वर्ग सेवा रस्ता नसल्याने मुख्य रस्त्यावरून वाहनासह ये-जा करत असतात. त्यामुळे अनेक

अपघात होऊन अनेक कर्मचाऱ्याचे बळी गेलेले आहेत. सबब, सेवा रस्ते कोठेही खंडीत न होता ते पुर्णपणे महामार्गाच्या दुर्तफा होणे अत्यंत निकडीचे आहे याबाबत आपण ठोस असा निर्णय घ्यावा अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. प्रशासनाने याची दक्षता घ्यावी अन्यथा भागातील नागरिकांना घेवून जन आंदोलन उभा करण्यात येईल. याबाबतचे निवेदन चंद्रकांत बाबुराव भरडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळाईवाडी चे व्यवस्थापक प्रकल्प कार्यान्वयन इकाई कोल्हापूर यांना देण्यात आले ,-राजू यादव  बोलताना म्हणाले की पूर्वी रस्ता करत असताना ज्या ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका पुन्हा होऊ नयेत उंचगाव ब्रिज असेल तावडे हॉटेल ब्रिज असेल किंवा गोकुळ शिरगाव ब्रिज असेल हे ब्रिज प्राधान्याने मोठे होणे गरजेचे आहे तसेच तिन्ही एमआयडीसीला जोडणारे सेवा रस्ता ही अखंडित असावेत अशी मागणी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी आता रस्ते करत असताना जनतेची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल पूर्वीच्या चुका नक्की भरून काढू असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, तालुकाप्रमुख विनोद खोत, दक्षिण समन्वयक दत्ता पाटील, ग्राहक सेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपतालुकाप्रमुख शांताराम पाटील, युवा सेनेचे संतोष चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, फेरीवाला संघटनेचे बाळासो नलवडे, अजित चव्हाण, किशोर कामरा, रवींद्र जाधव, भारत खोत, आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.