कोपरखैरणे स्थानकाला फेरीवाले व भिकाऱ्यांचा विळखा.
कोपरखैरणे स्थानकाला फेरीवाले व भिकाऱ्यांचा विळखा.
नवी मुंबई :- नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सिडको द्वारे बनवण्यात आली असून जागतिक स्तरावर नावलौकिक प्राप्त केलेली आहेत. परंतु काही दिवसांपासून कोपरखैरणे व घणसोली या स्थानकांना बकालपणा आल्याचे दिसून येत आहे.
कोपरखैरणे स्थानकाच्या पश्चिम दिशेस तिकीट खिडकी जवळ भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असून येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये या भिकाऱ्यांनी आपला संसारही थाटला आहे. जेवण खाणे, झोपणे, पत्ते, जुगार खेळणे, लहान मुलांना लघुशंकेसाठी तिथेच बसविणे ही नित्याची बाब झाली आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक हे सिडको प्रशासनाच्या अधीन असून सुरक्षारक्षकही या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे, कारण यातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा दिल्याचे सूत्रांकडून वर्तविण्यात आले आहे, स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी बॅगा विकणे, मोबाईलचे हेडफोन, कव्हर विकणे, फळे विक्री, ज्यूस विकणे यासारखी दुकाने थाटली आहेत. संध्याकाळच्या वेळेस स्थानकस बाजाराचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. याबाबत बिलाल नावाच्या फेरीवाल्यांकडून विचारणा केली असता स्वप्निल नामक अधिकाऱ्याकडून आम्हाला परवानगी मिळाली आहे असे वर्तविण्यात आले. अर्थातच हे फेरीवाले चिरीमिरी देऊन परवानगी मिळवत आहेत व अनाधिकृत रित्या व्यवसाय करीत आहेत.
पूर्वी सकाळ संध्याकाळ या सुंदर स्थानकात फेरफटका मारण्यासाठी स्थानिक लोक येत असत काही ज्येष्ठ नागरिक येथे ग्रुप बनवूनही बसत असत परंतु आता बसण्याच्या कट्ट्यांवर दारुडे, नशेडी लोक येऊन झोपत आहेत याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना होत असून या गंभीर समस्येबाबत आर. पी. एफ. व सिडको प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल ज्येष्ठ नागरिकांकडून विचारला जात आहे.
Comments
Post a Comment