नुकुल दादा देशमुखच्या रुपात मिळाला हक्काचा भाऊ.

 नुकुल दादा देशमुखच्या रुपात मिळाला हक्काचा भाऊ.

आशा वर्कर,मदतनीस, सेविका यांनी केल्या भावना व्यक्त.

रिसोड : कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून महिलांना एक हक्काचा घर,व हक्काच भाउ मिळाला,शासन व प्रशासन स्तरावर आशा वर्कर,मदतनीस, सेविका यांच्या कार्याची सहसा कोणी दखल घेत नाही. मनापासून काम करून आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा सेविका मदतनीस ह्या नेहमीच अलिप्त असतात. मात्र संत सातारकर महाराज संस्थान मध्ये आयोजित सत्कार सोहळ्यातून कोणीतरी आहे जे अशा महिलांना न्याय मिळवून देणार व तसेच त्यांच्यासाठी झटणार अश्या आशा पल्लवीत झाल्या असल्याच्या सदर सोहळ्यानंतर महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर महिलांच्या अनेक प्रश्न आहेत जे शासन दरबारी कुठेतरी अडकून पडलेले आहे. मात्र एडवोकेट नकुल दादा देशमुख यांच्या माध्यमातून आपले प्रश्न शासन दरबारी आता कोणीतरी मांडेल अश्या आशा पल्लवीत झाल्या असल्याच्या आशा वर्कर, अंगनवाडी सेविकांचे म्हणणे आहे.आपले आरोग्य व जीवाची पर्वा न करता गावाची काळजी वाहणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस कशाचीही पर्वा न करता तुटपुंज्या मानधनात इमान इतबारे आपले आपले कर्तव्य बजावत असतात. याच अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत ऍड नकुलदादा देशमुख यांनी रिसोड  तालुक्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा रक्षाबंधन निमित्त भावाकडून बहिणीला सदिच्छा भेट कृतज्ञता सोहळा देशमुख यांच्या संकल्पनेतून रिसोड येथे संपन्न झाला.आशा वर्कर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कोरोना काळ व त्यानंतर प्रत्येक क्षणी प्रत्येक गावात कार्य मोलाचे आहे.त्यांच्या कार्याचा,योगदानाचे गौरव व्हावा यासाठी ॲड.नकुलदादा देशमुख यांनी रक्षा बंधनाच्या औचीत्यावर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता.रिसोड  तालुक्यातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार व त्यांना भेट वस्तू देऊन या कृतज्ञता सोहळ्यात त्यांचा सन्मान  करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने रिसोड  तालुक्यातील या समाजात अनमोल कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.यावेळी सन्मान सोहळ्यास ॲड.नकुल दादा देशमुख,सौ.जयश्रीताई देशमुख, सौ.अमृताताई,नगराध्यक्षा विजयमाला कृष्णाजी आसनकर,ठाणेदार देवेंद्र ठाकूर,रिसोड मुख्याधिकारी सतीश शेवदा, कऱ्हाड मॅडम, डॉ.सौ.सुनंदा देशमुख, सौ. माधुरीताई देशमुख,वैशाली संदीप इरतकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.