मौजे वडगाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मधुकर अकिवाटे यांची बिनविरोध निवड.
मौजे वडगाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मधुकर अकिवाटे यांची बिनविरोध निवड.
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
मौजे वडगाव, ता. हातकणंगले येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी त्रिमूर्ती पतसंस्थेचे चेअरमन,कामधेनू दूध संस्था व दत्त विकास सोसायटी चे माजी संचालक,यात्रा कमिटी सदस्य श्री मधुकर अकिवाटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रं 9 महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठित करणे या विषयावर चर्चा होऊन मधुकर अकिवाटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सूचक म्हणून माजी सरपंच व जय शिवराय ग्रामविकास आघाडी चे प्रमुख सतीश चौगुले तर गणेश पाणीपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन आनंदा जाधव यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर सरपंच कस्तुरी पाटील व शिरोली एम आय डी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश कांबरे,स्वप्निल चौगुले,रघुनाथ गोरड,नितीन घोरपडे,ग्रामपंचायत सदस्या सुनिता मोरे, सविता सावंत,दिपाली तराळ,सुवर्णा सुतार यासह अंगणवाडी सेविका ,ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment