परशराम शिंगाडे यांना मोठ्या राजकिय नेत्यांनी नगरसेवक पदासाठी दिला शब्द शिंगाडे मैदानात ठोकणार षंडु.
परशराम शिंगाडे यांना मोठ्या राजकिय नेत्यांनी नगरसेवक पदासाठी दिला शब्द शिंगाडे मैदानात ठोकणार षंडु.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
जयसिंगपूर/ प्रतिनिधी
------------------------------------------
परशराम शिंगाडे हे जयसिंगपूर मधीबल एका गरीब कुटुंबातील मुलगा... त्यांच्या वडीलधाऱ्या पासुन त्यांचा दगड फोडण्याचा व्यवसाय ...वडील दगड फोडण्याचे काम करायचे पण घर चालवण्यासाठी पैसा कमी पडायचा त्यावेळी परशराम शिंगाडे यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी घरची परिस्थिती नसल्यामुळे शाळा शिकत शिकत वडिलांना हातभार लावत परशराम शिंगाडे यांनी दगड व्यवसायात कामास उतरून पन्नास रूपयां पासून ते शंभर रूपयां साठी ते सकाळी लवकर उठून कामावर जायचे त्यातूनच आपले शिक्षण व घर खर्च परशरामला बघायला लागायचे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये घरी मेणबत्ती पेटवून अभ्यास करायला लागायचा त्यातुन त्यांनी इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेतला घरी रात्री लाईट नसायची या परिस्थितीची जाणीव त्यांच्या डोक्यात सारखे खुळ घालायचे परशरामला वाटयचे कि आपल्याही घरात एक दिवस लाईट येईल आपल्यालाही राहण्यासाठी मोठे घर होईल पण परिस्थिती बिकट असल्यामुळे परशराम शिंगाडे यांची स्वप्न काही पूर्ण झाली नाहीत त्यानंतर त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून ते गौण खनिज क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला वयाच्या तेवीस व्या वर्षी परशराम शिंगाडे यांनी एक संस्था स्थापन करून तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतुने या क्षेत्रात परशुराम उतरले पण आजरोजी स्वतःच्या पायावर उभारून आज ते संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यावेळी त्यांनी गौण खणिजसाठी एक प्रस्ताव तयार करून स्वतःची वाटचाल सुरू केली परशराम शिंगाडेचा उद्देश एकच होता कितीही शिक्षण घेतले तरी आपली परिस्थिती गरीब असल्यामुळे आपल्याला नोकरी लागू शकणार नाही त्या वेळी मनात ठरवून शिंगाडे यांनी वडार समाजातील मुलांना व्यवसायात आणण्यासाठी संस्थेच्या नावावर त्यांनी शासनाकडुन एक जमिन उपलब्ध करुन काम चालू केले पण हे सर्व करत असताना परशरामाची धडपडत पाहुन त्यांच्या वडिलांना त्यांचा अभिमान वाटायचा घरी लाईट आली मोठे घर उभारले यातुनच घरची सर्वंच मंडळी खुश होती वडिल कायम म्हणायचे परशराम शिक्षणापासून थांबला पण उद्योगात त्याने भरपूर कष्ट करून हे सर्व उभा केले असल्याचे वडिलांनी सांगितले पण परशराम शिंगाडेचा प्रवास बघून मोठ्या राजकिय नेत्यांचे परशराम शिंगाडेना पाठबळ असल्याचे गोपनीय सुत्रांकडून माहिती समोर येते पण शाहूनगर भागांमधे नगरसेवका साठी नवीन नवीन चेहर्यामुळे आता एकच चर्चा रंगली आहे कोण बनेगा कोरडपती या येत्या इलेक्शनमध्ये तरुण पिढी सक्रिय असल्याचे दिसते यातुनच युवा पिढी जर प्रत्येक वार्ड मध्ये निवडणूका जिंकल्या तर शाहुनगर भागात सर्वाजणीक ठिकाणी रस्ते,गटारी,लाईट,पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान,आरोग्य योजना, सर्व शाहुनगर वासियांना बघायला मिळणार आहे ...तर बघुया परशराम शिंगाडे हे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय मैदानात उतरणार की आपला व्यवसाय सांभाळनार याकडे विरोधकांचे मात्र लक्ष लागुन राहिले आहे.
Comments
Post a Comment