२५ ऑगष्ट रोजी पंचायत समिती जावली ( मेढा ) येथे जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत कृषी औजारांचे लॉटरी सोडत पध्दतीने वाटप.
२५ ऑगष्ट रोजी पंचायत समिती जावली ( मेढा ) येथे जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत कृषी औजारांचे लॉटरी सोडत पध्दतीने वाटप.
भणंग:-ऑगष्ट रोजी पंचायत समिती जावली ( मेढा ) येथे जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत कृषी औजारांचे लॉटरी सोडत पध्दतीने वाटप करण्यात येणार आहे तरी या योजनेत सहभागी अर्जदार शेतकऱ्यांनी पं .स. सभागृहात सकाळी ठिक११ वाजता उपस्थीत रहावे असे आवाहन पं .स .जावलीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी श्री मनोज भोसले यांनी केले आहे .
जावली ( मेढा ) तालुक्यात जिल्हा परिषद सेस योजना २०२३-२०२४ अंतर्गत कृषी औजारांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते परंतू मंजूर उद्दीष्टापेक्षा दाखल अर्जांची संख्या जास्त असल्याने लाभार्थी निवड हि लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे . यासाठी या योजनेत सहभागी अर्जदार शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभागृहात शुक्रवार दि .२५ ऑगष्ट रोजी सकाळी ठिक११. वाजता हजर रहावे असे आवाहन पं .स.जावलीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री मनोज भोसले यांनी केले आहे .
Comments
Post a Comment