आरटीआयच्या नावाने फेरीवाल्यांवर दादागिरी. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले.
आरटीआयच्या नावाने फेरीवाल्यांवर दादागिरी. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले.
नवी मुंबई :-"पहिले आमचा विचार करा नाहीतर धंदे चालू देणार नाही" असे गोरगरीब फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून जोरजबरदस्तीने चिरीमिरी घेणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी हैदोस घातला आहे.
अरुण गुप्ता व गोविंद साळुंखे आरटीआयच्या नावाने तुर्भे 'डी' विभागातील अधिकाऱ्यांना अर्ज करून माहिती घेत आहेत. माहीती प्राप्त होताच हे दोघे एपीएमसी मार्केट येथील फेरीवाल्यांना दमदाटी करत असून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम करीत आहेत. तसेच कारवाई न केल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधतात व स्थानिक नेत्यांचे नाव घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत.
अशा आरटीआयच्या गैरवापर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे पत्र 'भारतीय अपराध अनुसंधान जांच एजन्सी' चे पदाधिकारी प्रदीप कणसे यांनी पालिका आयुक्तांना दिले असून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment