लग्न मोडुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लग्न मोडुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
ठरलेले लग्न मोडुन फसवणूक तब्बल 5 लाख 90 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. विश्वास माने, वनराज माने यांच्या सह महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सदर घटना दिनांक सोळा जुन रोजी घडली आहे. लग्न ठरल्यानंतर मुलांचे व मुलींचे विचार जुळत नाहीत असे कारण सांगून साखरपुडा झाल्यानंतर सुमारे 20 दिवसांनी मुलाकडील मंडळींनी लग्नास नकार दिला. दरम्यानच्या काळात साखरपुडा विधीसाठी झालेला खर्च, मौल्यवान वस्तू, कपडे व इतर साहित्य यासाठी तक्रारदार यांचे 5,90,000 रूपये खर्च झाले होते. या रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment