विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.

 विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा. 

--------------------------------------------

 जयसिंगपूर: प्रतिनिधी

 नामदेव भोसले

--------------------------------------------

जास्त पैसे मोजा, हवे ते मिळवा : कारवाया, नियम केवळ नावालाच

 एक गुटखा पुडी मिळते पाच रुपयांऐवजी दहा रुपयांना तर दुसरी २० रुपयांची पुडी मिळते ३० रुपयांना......तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला मनाई आहे, पण ती कागदावरचा शहरातील मंदिरे असो किंवा शाळा सर्वच प्रतिबंधित क्षेत्रात पानटपरीवर सर्व काही सर्रास मिळते.तंबाखूजन्य पदार्थामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजार होतो. त्यामुळे त्याला शासकीय पातळीवर प्रतिबंध आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात तर शंभर मीटर अंतरावर अशा प्रकारच्या पदार्थाना विक्रीस मनाई आहे. मात्र, हे सर्व कागदावरच

आहे. जयसिंगपूर, उदगाव, दोनोळी,कोथळी, उमळवाड अनेक पानटपऱ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भात खात्री केली. विशेष म्हणजे महाविद्यालयाजवळील पानटपन्यांवर येथे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विकला जात नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु जाणकारांना कुठे काय मिळते ते माहिती आहे आणि दुकानदारदेखील बरोबर संबंधितांना पारखून सहजपणे मागेल ते देत असतो. त्यामुळे तंबाखूविषयी जागृती करून त्यावर कितीही प्रतिबंध घालण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र, यंत्रणांना न जुमानता विक्री सुरू आहे.


जयसिंगपूर पोलीस स्टेशन चे पोलीस अमोल अवघडे व रोहित डावाळे अंकली टोल नाक्यावर 'गुटखा किंग' च्या मुसक्या आवळल्या 

सर्वसामान्य लोकांकडून कौतुक तर होत आहेत पण झोपडपट्टीमध्येे राहणाऱ्या महिलांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर जयसिंगपूर मधले मटका बंद करावे 

व 'गुटखाकिंग' वाल्यासारखं 'मटका किंग' वाल्यांना पण मुस्क्या आवळा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.