वकृत्व स्पर्धा अतिशय जोरदार पद्धतीने पार.
वकृत्व स्पर्धा अतिशय जोरदार पद्धतीने पार.
कोल्हापूर- युवासेना मार्फत सडेतोड युवक बोलणार महाराष्ट्र ऐकणार ही सपर्धा अतिशय उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे, मुरलीधर जाधव,युवासेना विस्तारक डॉ.सतीश नर्सिंग,युवासेना जिल्हा युवा अधिकारी मनजीत माने,शहर प्रमुख सुनील मोदी,हर्षल सुर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य श्वेता परूळेकर व निशांत गोंधळी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी अडतीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला. अंतिम फेरी मुंबई मधे होईल असे युवासेनेच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर,तसेच युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment