परळी खोऱ्यातील कूस खुर्द येथील विजय आवकीरकर यांना "राष्ट्रपती पदक "

 परळी खोऱ्यातील कूस खुर्द येथील विजय आवकीरकर यांना "राष्ट्रपती पदक "

परळी  :खोऱ्यातील कूस खुर्द येथील रहिवासी असलेले सध्या मुंबई येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले विजय रामचंद्र अवकिरकर यांना पोलीस दलामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. विजय आवकीरकर यांना आत्तापर्यंत 153 बक्षिसे प्राप्त झाली असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह ही प्राप्त झाले आहे. तसेच सन 2004 पासून सन 2023 पर्यंत "सर्वोत्कृष्ट "असे शेरे ही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल परळी खोऱ्यातून अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

विजय आवकीरकर यांचे श्री माध्यमिक शिक्षण श्री .छ. शिवाजी हायस्कूल परळी येथे शिक्षण झाले .असून ते सात डिसेंबर 1990 रोजी राज्य राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले. सुरुवातीस  गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असताना नक्षल विरोधी अभियानात सहभाग घेतला . पोलीस प्रशिक्षण विद्यालय( मरोळ) मुंबई येथे कवायत शिक्षक म्हणून उत्कृष्ट काम केले .त्यानंतर मुंबई पोलीस दलात बढती झाली 2006 ते 2010 पर्यंत सशस्त्र पोलीस वरळी येथील मुख्यालयात कवायत शिक्षक म्हणून काम करीत असताना सुमारे दोन हजार पोलीस प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. 2010 ते 2016 पर्यंत दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक नियमन व नियंत्रण म्हणून उत्कृष्ट काम केले .

सन 2016 ते 2021 या कालावधीत शिवडी पोलीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागात गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करणे, अमली पदार्थ विक्री करणारे आरोपी, चोरी करणारे, बँक फ्रॉड, चीटिंग करणारे, मोबाईल चोर ,इत्यादी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली.

 शिवडी पोलीस ठाणे येथे दरम्यानच्या काळात विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक करून एकूण ७५ बक्षीस प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये पोलीस आयुक्त यांचे कडून उत्कृष्ट काम केल्याचे "बेस्ट डिटेक्शन"चे प्रमाणपत्र ही प्राप्त केले.

सन 2021  2022 मध्ये कफ परेड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावत असताना सायबर चीटिंग करणाऱ्या आरोपीस दिल्ली येथे अटक करण्याची महत्त्वाची कामगिरी पूर्ण केली.

विजय आवकीरकर यांची एकूण 32 वर्ष आठ महिने सेवा झाली असून या कालावधीमध्ये एकूण 153 बक्षीस प्राप्त केली आहेत 2004 पासून सन 2023 सलग "सर्वोत्कृष्ट "असे शेरे प्राप्त आहेत.

 या सर्व उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह ही विजय अवकीरकर यांना प्राप्त झाले आहे .  परळी खोऱ्यातील  कुस खुर्द  येथील सुपुत्राला सर्वोत्कृष्ट असा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पंचक्रोशीतून विजय आवकीरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.