चैतन्य संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी संघ करवीरच्या वतीने उत्साहाने साजरा.
चैतन्य संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी संघ करवीरच्या वतीने उत्साहाने साजरा.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
--------------------------------------
चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे या सामाजिक संस्थेचा ३०वा वर्धापन दिन यशस्वी ग्रामीण महिला संघाच्या वतीने क बावडा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
३०वर्षापूर्वी राजगुरुनगर पुणे येथे महिला सबलीकरणासाठी चैतन्य संस्थेची स्थापना मा डॉ सुधाताई कोठारी यांनी सुरेखाताई श्रोत्रीय, कल्पना पंत आणि त्यांच्या इतर सहकार्याच्या मदतीने केली.सुरुवातीला एक रुपया बचत करुन दहा बचत गट स्थापन करून कामाला सुरुवात केली.आज ५राज्यात काम सुरू असून,११हजार ४२०बचतगट असून १लाख १६हजार ६६९महिला काम करीत आहेत.
या संस्थेच्या माध्यमातून राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ३० गावात २३० बचत गटांची स्थापना करून यशस्वी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची निर्मिती झाली असुन २९००महिला संघासोबत काम करत आहेत.या संघाच्या वतीने क'बावडा येथे बचत गटाच्या वतीने चैतन्य संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला
सुरुवातीला स्वागत आणि प्रास्ताविक शितल कुसाळे यांनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन तसेच केक कापण्याचा कार्यक्रम जेष्ठ महिला जनाई , संघाच्या अध्यक्षा वैशाली घुणके आणि संघ व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांच्या हस्ते करण्यात आला.
संघाच्या अध्यक्ष वैशाली घुणके म्हणाल्या जास्ती जास्त महिलांनी सहभाग घेऊन बचत गट स्थापन करण्यात यावेत आणि शासकीय योजना मिळवून घ्याव्यात यानंतर व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांनी महिलांना मार्गदर्शन करताना चैतन्य संस्थेची निर्मिती कशी झाली आणि यातुन आपल्या यशस्वी संघाची निर्मिती झाली हे सांगितले आजच्या काळात महिला सबलीकरण चळवळ जोमात सुरू असुन बचतगट स्थापन कशा पध्दतीने करायचे महिलांना शासकीय योजना कोण कोणत्या आहेत उद्योग व्यवसाय करुन आपली कौटुंबिक उत्पन्न वाढले पाहिजे याविषयी माहिती दिली.त्यानंतर महिलांच्या संगीत खुर्चीचा आणि उखाणे घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यावेळी संघाच्या कार्यकर्त्यां मनिषा शिंगाडे, वैशाली कांबळे तसेच इतर बचत गटातील महिला उपस्थित होत्या शेवटी आभार मंजुळा पुजारी यांनी मानले.
Comments
Post a Comment