सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी केली दोन अपघातग्रस्तांना मदत.

 सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी केली दोन अपघातग्रस्तांना मदत.

सातारा येथील ग्रेड सेपरेटर मध्ये झालेल्या अपघातातील दोघा जखमींना सातारा तहसीलदार राजेश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार करणेसाठी वेळीच दाखल केल्याने दोघांचे जीव वाचले. सातारा तहसीलदार राजेश जाधव शनिवारी कार्यालयीन सुट्टी असताना ही नेहमीप्रमाणे काम करीत होते. कार्यालयातुन बाहेर पडल्यानंतर गोडोली कडे जाणा-या दिशेने ग्रेड सेपरेटर चया दिशेने ‌ते जात असताना दुचाकी स्वार आणि पादचारी जखमी अवस्थेत व्हिवळत पडले होते. रहदारी कमी असल्याने अपघात झाल्याची कल्पना कुणालाही नव्हती. समोर दोघे जण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसल्यावर तहसीलदार राजेश जाधव  यांनी त्यांच्या  वाहनचालक  वसंत सपकाळ गाडी थांबवायला लावुन क्षणाचाही  विलंब न लावता जखमीकडे धाव घेतली. अक्षय वसंत सुतार, राहणार संभाजीनगर , सातारा तसेच शिवाजी विष्णू साठे , राहणार एकंबे ‌तालुका कोरेगाव यांना स्वतः उचलून गाडीत घातले आणि जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यासाठी दाखल केले. त्यावेळी गाडी रक्ताने माखलेली होती. वाहन चालक वसंत सपकाळ यांनीही मदत केली. यावेळी सातारा वाहतूक पोलीस राहुल मोरे व संतोष पवार यांनी सहकार्य केले तसेच सेतू चालक विक्रम ननावरे तसेच निलेश कानकुने यांची  जिल्हा रुग्णालयात मदत झाली.  या मदतीने तहसीलदार राजेश जाधव यांच्या माणुसकीचे दर्शन झाले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.