सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये स्वच्छतेचा बोजवारा.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयु मध्ये स्वच्छतेचा बोजवारा.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्गंधी पसरली आहे. दररोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. नूतन शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी स्वच्छतेबाबत ग्वाही दिली होती पण सध्या आयसीयु विभागात तंबाखू, गुटखा, पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसत आहेत. वैद्यकीय निरूपयोगी साहित्य विल्हेवाट लावलेले नाही. शिवाय आयसीयु मध्ये जिकडे तिकडे अस्वच्छता निर्माण झाली आहे.
नेमके स्वच्छता कर्मचारी काम करतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छतागृह व्यवस्थित नसल्याने जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता कर्मचारी यांच्या वर कोणाचेही नियंत्रण नाही. ठेकेदार ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता केली जाते. नेमके आयसीयु म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होतो. रुग्णालयात स्वच्छता वेळेवर न झाल्याने रूग्ण लवकर बरे न होता त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर जबाबदार कोण ? स्वच्छता कर्मचारी स्वच्छता ही फारशी गांभीर्याने घेत नाहीत म्हणून शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे असे नागरिक व रुग्णांचे म्हणणे आहे. शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे ही बाब किती गांभीर्याने घेणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
Nice
ReplyDelete