तृणधान्याचे आहारामधील महत्त्व.

 तृणधान्याचे आहारामधील महत्त्व. 

----------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

 आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2022-23 अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सांगवडे शिक्षण प्रसारक मंडळ सांगवडे यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलमध्ये तृणधान्याचे आहारामधील महत्त्व याविषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.कार्यक्रमांमध्ये श्री बंडा कुंभार साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली मुलांना एमपीएससी चे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे तृण धान्य ची माहिती दिली व त्यानंतर श्री अरुण भिंगारदिवे साहेबांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व , राजगिरा ऑफ द मंथ विषयी विस्तृत विवेचन केले. तसेच संतुलित आहार ची  माहिती दिली .त्यानंतर श्रीमती वाळेकर मॅडम यांनी थोडक्यात आहार कसा असावा याची माहिती दिली. त्यानंतर पौष्टिक तृणधान्य विषयी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यातील तीन नंबर व उत्तेजनार्थ नंबर काढून त्यांना पारितोषिक देण्यात आले.

   प्रथम क्रमांक वेदिका रावळ, द्वितीय क्रमांक अक्षरा भेंडवडे, तृतीय क्रमांक सिद्धी कुंभार व उत्तेजनार्थ अथर्व साळुंखे. यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आले तसेच भागामध्ये पिक विमा काढण्यासाठी  सौ जयश्री चव्हाण व सचिन घनमाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. त्यांचेही सत्कार या ठिकाणी माननीय भिंगारदिवे सरांच्या हस्ते व कुंभार सरांच्या हस्ते करण्यात आले.  

दुपारच्या सत्रात उपविभागीय कृषी अधिकारी भिंगारदिवे साहेब यांनी राज्य पुरस्कृत गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पीक प्रात्यक्षिके प्रकाश पाटील यांच्या प्लॉटची पाहणी केली व त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत  हर्षवर्धन सुकुमार खोत व कुमार खोत यांनी खरेदी केलेले ट्रॅक्टरची पाहणी केली.

    सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरपंच सौ रूपाली कुंभार , उप सरपंच सौ कल्पना देसाई मॅडम ग्रामपंचायत चे सर्व महिला सदस्य  सांगवडे. तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्री अरुण भिंगारदिवे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी करवीर, तसेच श्री बंडा कुंभार तालुका कृषी अधिकारी करवीर, श्रीमती मोहिनी वाळेकर मॅडम मंडळ कृषी अधिकारी करवीर, श्री राहुल पाटील कृषी पर्यवेक्षक करवीर, श्रीमती गिता कांबळे कृषी सहाय्यक सांगवडे उपस्थित होते.

सांगवडे शिक्षण प्रसारक मंडळ सांगवडे विद्यालय सांगवडे चे प्राचार्य श्रीमती पाटील मॅडम व श्री प्रकाश पाटील सर  यांनी हा कार्यक्रम कृषी विभाग च्या संयुक्त विद्यमानाने खूप चांगल्या पद्धतीने घडवून आणला. यासाठी गीता कांबळे कृषी सहाय्यक यांनी त्यांचे आभार मानले.तसेच  उपस्थितांचे आभार नेर्लेकर मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.