संस्थाचालकासह मुख्याध्यापक आणि शिपायाला 45 हजार रुपयांची लाच लुचपत विभागाकडून अटक.

संस्थाचालकासह मुख्याध्यापक आणि शिपायाला 45 हजार रुपयांची लाच लुचपत विभागाकडून अटक.

----------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी 

अन्सार मुल्ला 

----------------------------------------------

 संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संकलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, धरणगुत्ती. तालुका शिरोळ,येथील तिघांना लाच घेताना अटक करण्यात आली.

या बाबत हकीकत अशी की संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या  (95,577 रुपये) इतक्या वेतन रकमेची लाच स्वरूपात मागणी करून ती लाच रक्कम दोन हप्त्यात देणेबाबत सांगून आणि तक्रारदाराने ती रक्कम न दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ रोखण्याची भीती देवून सदरची लाच रक्कम संस्थेचे मुख्याध्यापक यांच्याकडे देणेस सांगितले असता मुख्याध्यापक यांनी सदरची रक्कम सदरहू शाळेतील शिपाई यांच्याकडे देण्यास सांगून त्यांनी ती स्वीकारली असता त्याना रंगेहात पकडुन संस्थाचालकासह तीनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली सदरची कारवाई

सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक. ला.प्र.वि.कोल्हापूर,पो उप नि. बम्बर्गेकर,

सपोफो प्रकाश भंडारे.

हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने,पोलीस कॉन्स्टेबल मयूर देसाई ,रुपेश माने ,संदीप पवार,पोना/सचिन पाटील,

मपोकॉ/पुनम पाटील, चालक हेड कॉन्स्टेबल गुरव आणि हेड कॉन्स्टेबल अपराध यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.