हळदने गाठला 20 हजाराचा टप्पा.
हळदने गाठला 20 हजाराचा टप्पा.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------------------
रिसोड : रिसोडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने हळदीच्या भावात वाढ होत आहे यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केला जात आहे. हळद चे भाव वाढतच चालले असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.रिसोड बाजार समितीमध्ये आठवड्यातून दोन वेळा सोमवार व गुरुवार हळद खरेदी केली जाते. आज सोमवार 31 जुलै रोजी बाजार समितीमध्ये हळदी हाराशी सुरू झाली असता 13 हजार ते तब्बल 20 हजार 5 रुपये पर्यंत शेतकऱ्यांना भावा भेटला. यामुळे सध्या हळदी चर्चेचा विषय बनलेली आहे.सदर हा भाव रिसोड बाजार समितीच्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक असून सर्वाधिक भाव ची नोंद झालेली आहे. मागील वर्षी 8 हजार रुपये पर्यंत सर्वाधिक भाव हळदला होता.
Comments
Post a Comment