विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.

विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा. -------------------------------------------- जयसिंगपूर: प्रतिनिधी नामदेव भोसले -------------------------------------------- जास्त पैसे मोजा, हवे ते मिळवा : कारवाया, नियम केवळ नावालाच एक गुटखा पुडी मिळते पाच रुपयांऐवजी दहा रुपयांना तर दुसरी २० रुपयांची पुडी मिळते ३० रुपयांना......तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला मनाई आहे, पण ती कागदावरचा शहरातील मंदिरे असो किंवा शाळा सर्वच प्रतिबंधित क्षेत्रात पानटपरीवर सर्व काही सर्रास मिळते.तंबाखूजन्य पदार्थामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजार होतो. त्यामुळे त्याला शासकीय पातळीवर प्रतिबंध आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात तर शंभर मीटर अंतरावर अशा प्रकारच्या पदार्थाना विक्रीस मनाई आहे. मात्र, हे सर्व कागदावरच आहे. जयसिंगपूर, उदगाव, दोनोळी,कोथळी, उमळवाड अनेक पानटपऱ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भात खात्री केली. विशेष म्हणजे महाविद्यालयाजवळील पानटपन्यांवर येथे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विकला जात नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु जाणकारांना कुठे काय मिळते ते माहित...