नीलकमल लेआउट जयदत्त नगर मधील केलेले अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन करू",
नीलकमल लेआउट जयदत्त नगर मधील केलेले अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन करू",
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकूर
-----------------------------
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष विकास झुंगरे पाटील यांचा इशारा.( ) रिसोड शहरातील नीलकमल लेआउट जयदत्त नगरीमध्ये शेत सर्वे नंबर 397/2/ड येथे अतिक्रमण केले असून ते अतिक्रम काढण्यासाठी रिसोड नगर परिषदेला अनेक वेळा निवेदन दिले व 23 जुन रोजी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अमर उपोषण केले परंतु त्याचा काहीही फायदा न झाल्यामुळे येत्या १५ ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष विकास झुंगरे पाटील यांनी रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या प्रकरणाकडे जाणून-बुजून डोळे झाक करीत असून संबंधित व्यक्तींला पाठीशी घालत आहे असा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष विकास झुंगरे यांनी निवेदनात केला आहे त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तेथील अतिक्रमण न काढलयास आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.निवेदन देतेवेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ, दत्ता लांडगे, गगन डांगे, सुशांत इंगळे, बसिरोदिन कमरीदिन, शेख जाफर शेख अब्दुल्ला, फयीम खान एजाज खान, राजू फाजगे व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, नगररचना विभाग अमरावती, जिल्हाधिकार्यालय वाशिम, जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रिसोड, पोलीस निरीक्षक रिसोड यांना पाठविले आहेत.
Comments
Post a Comment