नागठाणे येथील शिकलगार टोळीला मोकका.

 नागठाणे येथील शिकलगार टोळीला मोकका.





--------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

किरण अडागळे .

--------------------------------------------------

विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागठाणे  तालुका सातारा येथील चौघांवर मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मदत होणार आहे. साहिल रुस्तुम शिकलगार,भरत संजय मोहिते, अमित उर्फ कन्हैया साळुंखे व आशीष बन्सीराम  साळुंखे , राहणार सर्व बोरगाव अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागठाणे परिसरात संशयितानी मोठी दहशत निर्माण केली आहे. तसेच त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न,अपहरण, दरोडा,जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोकका अंतर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलिसांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विषेश पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर फुलारी यांच्या कडे पाठवला होता. या प्रस्तावाची पडताळणी, करुन त्यांनी संबंधित  गुन्ह्याला मोकका कायदा लावण्यास मान्यता दिली आहे.  गुन्ह्याचा पुढील तपू उप अधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी करणार आहेत. या प्रस्तावाची मंजुरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर, बोरगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे , हवालदार अमित सपकाळ,प्रविण शिंदे, हिम्मत लफडे पाटील, विशाल जाधव, दादा स्वामी, बाळासाहेब जानकर यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.