बँक ऑफ इंडिया शाखा मुरगुडचा नावलौकिक खेडया- पाडयातही वाढवू*- आर .पी. कुलकर्णी.

 बँक ऑफ इंडिया शाखा मुरगुडचा नावलौकिक खेडया- पाडयातही वाढवू*- आर .पी. कुलकर्णी.

----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

मुरगूड हे शहर ४०ते ५० खेडयानीं जोडलेले आहे येथिल व्यवसाय अतिशय चांगला आहे . लोकांचा चांगला प्रतिसादही आम्हाला मिळालेला आहे . पुढील काळात लोकांच्या संपर्कातून मुरगूड बरोबरच खेडयापाडयातही बँक ऑफ इंडियाचा नावलौकीक वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुरगूड येथिल उद्योजक मेळाव्यात बोलतानां श्री .आर. बी . कुलकर्णी यानीं व्यक्त केले .

  बँक ऑफ इंडिया शाखा मुरगुडच्या ५३ व्या वर्धापनदिनानिमित्य येथील श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह .पतसंस्थेच्या सभागृहात ते बोलत होते . पुढे ते म्हणाले बँकेचा ठेवी 152 कोटी तर कर्ज 53 कोटी आहे. २००५ कोटीचा व्यवसाय झाला असून ३०० कोटीचे उदीष्ठ पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यानीं दिली . 

यावेळी अमित गायकवाड, जवाहरलाल शहा, निलेश जगताप, कल्याणी सुतार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रास्ताविक सुनील गायकवाड यांनी केले 

 उद्घाटन श्री आर पी कुलकर्णी असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी केले तर दिपप्रज्वलन जवाहर शहा, अनंत फर्नांडिस,आमित गायकवाड, निलेश जगताप , यांच्या हस्ते करण्यात आले

तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व इतर योजना, पी एम किसान योजना,महिला बचत गट, पी एम स्वनिधी,PMEGP,CMEGP, चा लाभ घेण्यासाठी आवाहन केले

तसेच या योजनाचे मंजुरी पत्र वाटप लक्ष्मीनारायण चे संस्थापक अध्यक्ष जवाहरलाल शहा, आर.पी. कुलकर्णी ,अमित गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले

 यावेळी लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन अनंत फर्नांडिस , राहुल वंडकर ,मुरगुड नगरपालिकेच्या अधिकारी चौगुले मॅडम, शशी दरेकर,उद्योगपती प्रविण दाभोळे , दत्तात्रय तांबट ,सुभाष अनावकर,श्रावण नर्तवडेकर आदी खातेदार उपस्थित होते . 

 कार्यक्रमासाठी अभिषेक कुमार, प्रद्युम्न पवार , अतुल पाटील, सुहास भरणी ,सोनाली चौदरी ,वसंत रेडेकर यांचे सहकार्य लाभले . 

कार्यक्रमाचे -सुत्रसंचलन सुनील गायकवाड यांनी केले तरआभार दिनेश तारक यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.