मोटार सायकल वरुण तोल गेल्यामुळे जेसीबी च्या चाकाखाली सापडून वृद्धेचा दुदैवी मृत्यू!गडमुडशिंगी मधील घटना!
मोटार सायकल वरुण तोल गेल्यामुळे जेसीबी च्या चाकाखाली सापडून वृद्धेचा दुदैवी मृत्यू!गडमुडशिंगी मधील घटना!
कोल्हापूर : जनावरांच्या धारा काडून शेतामधून मुलग्याच्या मोटरसायकलून घरी परत येत असताना अचानक तोल गेल्यामुळे इंदुबाई मारुती शिरगावे व.व.75 या वृद्ध महिलेचा जेसीबी च्या चाकाखाली सापडून दुदैवी मृत्यू झाला हा अपघात मुडशिंगी येथील शेतकरी सेवा सोसायटी च्या समोर झाला.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की नेहमी प्रमाणे इंदुबाई शिरगावे या आज सकाळी आपल्या शेतामध्ये गेल्या होत्या दुपारपर्यंत शेतीतील सर्व कामे केल्या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जनावरांच्या धारा काढून दुध घेऊन मुलगा जीवन सोबत मोटार सायकल वरुण घरी परत येत असताना अचानक तोल गेल्यामुळे शेतकरी सेवा सोसायटी च्या वळणावर जेसीबी च्या चाकाखाली सापडून इंदुबाई मारुती शिरगावे या वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद जीवन शिरगावे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून जेसीबी ड्रायव्हर सागर खामकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताची माहिती मुडशिंगी ग्रामस्थांना समजताच अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती मनमिळाऊ स्वभावाच्या इंदुबाई शिरगावे होत्या त्यामुळे उपस्थित मुडशिंगी च्या महिलांना दुःख अनावर झाले होते.
Comments
Post a Comment