पर्यटनाचा आनंद मनसोक्त घ्या पण कायद्यात..
पर्यटनाचा आनंद मनसोक्त घ्या पण कायद्यात..
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------------
3६ वाहनांवर चंदगड पोलिसांची कारवाई; १० हजारांचा दंड वसूल
पर्यटनाचा आनंद मनसोक्त घ्या पण, कायद्यात राहून असा संदेश देत सीमाभागातून चंदगड तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करून 3६ वाहनांवर चंदगड पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. शनिवार, रविवारी केलेल्या या कारवाईत १० हजार ७०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान एक व्यक्तीवर ड्रींक अँड डाईव्हची देखिल कारवाई केली आहे.
दरम्यान, चंदगड पोलीसांनी तडशिनहाळ फाटा, हलकर्णी एमआयडीसी येथे नाकाबंदी करून रविवार( दि. 3 o रोजी) ही कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान 60 वाहनाची तपासणी करून दोषी 36 वाहन धारकाच्यावर मोटार वाहन कायदानुसार कारवाई केली आहे. या कारवाइत पोना भदरगे, पो.का. कोळेकर व होमगार्ड सहभागी झाले होते.
पर्यटकांना चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी संदेश दिला आहे की, चंदगड तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच आहे. परंतू, शांतता भंग करणारे व हुलडबाजी करणाऱ्या विरोधात विकेंडला प्रत्येक शनिवार, रविवार अशी मोहीम राबविण्यात येत आहे. पर्यटकांनी व वाहनधारकांनी शाततेत निसर्गाचा आनंद घ्यावा, सहकुटुंब सहपरिवार निसर्गाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना त्रास देवू नये, हुल्लडबाजी किंवा मधपान करून दंगा मस्ती कर नये. तरी सुचनांचे पालन न करणाऱ्या तसेच दारू पिवून वाहन चालवणाऱ्या चालकावरही अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
Comments
Post a Comment