भोगावती नदी काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये.राधानगरीचे प्रांत अधिकारी सुशांत बनसोडे.
भोगावती नदी काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये.राधानगरीचे प्रांत अधिकारी सुशांत बनसोडे.
---------------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------------------------
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पैकी पाच स्वयंचलित दरवाजे आज दुपारी खुले झाले असल्याने भोगावती नदीला पूर आल्याने नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊ नये व धोका पत्करणे असा इशारा राधानगरीचे प्रांत अधिकारी सुशांत बनसोडे यांनी राधानगरीचे , दैनिक जनमत प्रतिनिधी विजय बकरे यांच्याशी बोलताना दिली.
राधानगरी धरणाचे सात पैकी पाच स्वयंचलित दरवाजे दुपारी मुसळधार पावसामुळे खुले झाले असून असाच मुसळधार पाऊस पडल्यास आणखी दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यास भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन धोका होऊ शकतो व भोगावती नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने त्या शेतामध्ये शेतकऱ्याने शेतामध्ये जाऊ नये व धोका पत्करणे असा इशारा राधानगरीचे प्रांत अधिकारी सुशांत बनसोडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांनी राधानगरी धरणाला भेट दिली त्यावेळी राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख सर्कल ऑफिसर सुंदर जाधव व भोगावती पाटबंधारे खात्याचे डेप्युटी इंजिनिअर प्रवीण पारकर हे होते.
Comments
Post a Comment