भर दिवसा मंदिराच्या आवारातून मोटरसायकल चोरी.पोलीस यंत्रणेसमोर आव्हान
भर दिवसा मंदिराच्या आवारातून मोटरसायकल चोरी.पोलीस यंत्रणेसमोर आव्हान
कोल्हापूर :-अंबाबाई मंदिरा सारख्या कोल्हापुर शहरातील गर्दीच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली लाइव्ह चोवीस तास न्यूज नेटवर्कचे विशेष प्रतिनिधी नवाब शेख यांची हीरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरी होण्याची घटना मंगळवारी २५ जुलै रोजी घडली . नवाब शेख यानी दुपारी बारा वाजता इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूल बाहेरील पार्किंग मध्ये गाड़ी पार्क करुन ते आपल्या अन्य कामासाठी बाहेर गेले होते .रात्री नऊ वाजता ते गाड़ी न्यायला आले असता गाड़ी कुणी तरी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले . त्यानी बुधवार पर्यंत गाडीचा शोध घेऊन जूना राजवाड़ा पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची तक्रार दिली . अंबाबाई मंदिराच्या प्रवेश द्वारापासुन केवळ काही फुटावर असलेल्या पार्किंग मधून मोटरसायकल चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना आहे .२०१२ मॉडेल ची हीरो स्प्लेंडर बनावटीची ही मोटरसायकल असून तिचा रंग काळा आहे .एम एच 09 CN 0802 क्रमांकाची ही मोटरसायकल कुणाला निदर्शनास आल्यास जुना राजवाड़ा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ठाणेकर यांच्याशी संपर्क साधावा किंवा नवाब शेख ( विशेष प्रतिनिधी ,लाइव्ह चोवीस तास न्यूज नेटवर्क मोबाइल क्रमांक 7741851155) यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment