ग्रामीण रुग्णालय सोमर्डी मधील रुग्णांना फळे व बिस्किट वाटप.
ग्रामीण रुग्णालय सोमर्डी मधील रुग्णांना फळे व बिस्किट वाटप.
--------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
जावळी प्रतिनिधी
सूर्यकांत जाधव
----------------------------------------------------------
दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयु.किरण बगाडे यांच्याकडून फळे व बिस्कीट वाटप.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. दीपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस 27 तारखेला होता इर्शाळवाडी जिल्हा रायगड या ठिकाणी घडलेली दुर्घटना तसेच महाराष्ट्रामध्ये वाढत्या पावसामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाल्याने वाढत्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे दीपक भाऊ निकाळजे यांनी वाढदिवस न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते त्याच सामाजिक उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे सातारा जिल्हा सचिव आयु किरण बगाडे यांनी भव्य वाढदिवस साजरा न करता दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा अध्यक्ष आयु.दादासाहेब ओव्हाळ यांच्या आदेशाने सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामीण रुग्णालय सोमर्डी येथील सर्व रुग्णांना केळी फळे बिस्किट खारी वाटप तसेच त्यांना शालेय साहित्य वाटप करत एक आगळावेगळा अनोखा वाढदिवस दीपक भाऊ निकाळजें यांचा साजरा केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे जिल्हा सचिव आयु. किरण बगाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम,तालुकाध्यक्ष अमित साळुंखे उपाध्यक्ष सयाजी भिसे तालुका सचिव दिगंबर कांबळे राम गायकवाड अभिजीत भोसले पत्रकार इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment