Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा येथील दोन न्यायाधीश यांची तडकाफडकी बदली, न्यायालयात खळबळ, एसीबीच्या गोपनीय अहवालानंतर कारवाई.

 सातारा येथील दोन न्यायाधीश यांची तडकाफडकी बदली, न्यायालयात खळबळ, एसीबीच्या गोपनीय अहवालानंतर कारवाई.

सातारा येथील जिल्हा न्यायालयात असलेल्या दोन न्यायाधीशांची तडकाफडकी बदली आदेश देण्यात आले आहेत यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांची पदावनती करत पुण्याला तर तिसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. सालकुटे यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित न्यायाधीश यांचा  गोपनीय अहवाल तसेच वकील संघटनेने टाकलेल्या बहिष्कार यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्हा न्यायालयात न्यायदान करताना निर्दोष होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले होते. यातुनच वकीलांमधे धुसफूस सुरू होती. न्यायदान करताना उघड उघड चर्चा होऊ लागली. या सर्व बाबी न्याय व विधी मंडळाकडे जात होत्या. त्यातुन सातारा एसीबीच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी गोपनीय माहिती घेऊन त्याबाबत अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. एसीबीने त्यानुसार गेली चार महिने न्यायालयातील बहुतांश कामकाजासंबंधी माहिती मिळवली. मिळालेली माहिती व त्या अनुषंगाने दुसरी बाजू पासुन खातरजमा करून गोपनीय अहवाल तयार करण्यात आला. दुसरीकडे न्यायदानावरुन वकील संघटना आक्रमक झाली. बार असोसिएशनचे एका मिटींग मध्ये उघडं उघड दोन न्यायाधीश यांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची एकमुखी मागणी होवून कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला व याबाबत पत्र मुंबई उच्च न्यायालयात पाठविण्यात ऊ. वकिलांनी आपली बाजू आक्रमक होवून मांडली. वरिष्ठांनी लक्ष घालून निर्णय घ्यावा अशी मागणी वकील संघटनांनी केली. एसीबीचे गोपनीय अहवालात दिलेली माहिती वाचून अखेर सातारा जिल्हा न्यायालयात एक मुंबई उच्च न्यायालयाची कमिटी आली व गेले दोन दिवस त्यांनी सर्व माहिती घेऊन उच्च न्यायालयात त्याबाबत सर्व बाबी सांगितल्या.  या माहितीवरून संबंधित दोन्ही न्यायाधीशांची बदली करण्याचे आदेश ताबडतोब देण्यात आले.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात कार्यभार स्वीकारला तेव्हा पासून वकील मंडळी मध्ये धुसफूस सुरू होती. सुरुवातीला सामंजस्य दाखवून विषय ताणला जाणार नाही याची दक्षता घेतली होती मात्र तरीही वकीलांना वाईट अनुभव येतच राहिले. येत्या रविवारी न्यायाधीश मंगला धोटे सेवा निवृत्त होत असतानाच अवघ्या पाच दिवसांसाठी पदावनती ह़ोवुन बदली झाल्याने जिल्हा न्यायालयात चांगलीच चर्चा रंगली होती. 

याबद्दल सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.विजय देशमुख म्हणाले, न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कामकाजाविषयी  अनियमितता  तर न्यायाधीश एस आर सालकुटे यांच्या चुकीच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यात आली होती. दोन्ही न्यायाधीशांसमोर कामकाजाबाबत असहकार आंदोलन पुकारले होते. आमच्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाने दखल घेतली त्याबद्दल आभारी आहे.

Post a Comment

0 Comments