परळी गावामध्ये स्वच्छतागृह नसल्याने महिला, पुरुष, विध्यार्थी तसेच पर्यटकांची कुचंबना..
परळी गावामध्ये स्वच्छतागृह नसल्याने महिला, पुरुष, विध्यार्थी तसेच पर्यटकांची कुचंबना..
परळी;-शासनाने हागणदारी मुक्त गाव योजना राबवली होती यामध्ये प्रत्येक कुटुंबीयांकडे आपले स्वच्छालय हवेत याचबरोबर मोठ्या गावांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह हवीतच असा शासन नियम होता मात्र अजूनही अनेक गावांमध्ये बाहेरील लोकांसाठी खुले स्वच्छतागृह नसल्याचे आढळते.
स्वच्छता गृह आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो त्यामुळे शासकीय कार्यालय तसेच मोठ्या गावांमध्ये शाळा कॉलेज अशा ठिकाणी महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी स्वच्छतागृह हवे त्या ठिकाणी पाण्याची सोय असावी जर अशा सोयी उपलब्ध केल्या नाहीत तर शासनाच्या नियमांची पायमल्ली होते
सातारा तालुक्यातील परळी पंचक्रोशीतील बाजारपेठेचे गाव म्हणून परळीची ओळख आहे .
परळी येथे येणाऱ्या पंचक्रोशीतील लोकांची संख्या तसेच पर्यटक यांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे या गावांमध्ये महिला व पुरुष येत असतात या लोकांना स्वच्छतागृह नसल्याने विशेषता महिलांची फार कुचंबना होते . परळी येथे दररोज प्राथमिक आरोग्य केंद्र पोस्ट कार्यालय पोलीस स्टेशन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक बँक ऑफ महाराष्ट्र कार्ड सिद्धेश्वर मठ सोसायटी, शाळा, महा ई सेवा केंद्र तसेच बाजारभागासाठी येणाऱ्या लोकांची महिलांची, विध्यार्थी, तसेच पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मात्र या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी खुले स्वच्छतागृहच नाही यावर खुलेआम कोणीही बोलत नसल्यामुळे महिलांची तसेच पुरुषांची मोठी गैरसोय होत आहे मात्र लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आली आहे.
यामुळे उघड्यावर शोच्यास् बसणे तसेच सार्वजनिक ठिकाणी लघवीस उभे राहणे उभे राहणे असे प्रकार होत असतात यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
बस स्थानकात बाहेरील प्रवासी आल्यावर या ठिकाणी शौचालय कोठे आहे? असा प्रश्न उपस्थित करतात यावर उघड्यावरच दूर कुठेतरी जावे लागेल असे नामुष्कीने सांगण्याची वेळ स्थानिकांना येते
गटविकास अधिकारी लक्ष देणार का?
सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे त्यासाठी ग्रामपंचायत इकडे कोणी मागणी केली आहे का? तसा ठराव ग्रामपंचायत मध्ये कधी पारित झाला आहे का? यावर सत्ताधारी किंवा विरोधी सदस्यांनी कधी आक्रमकपणे भूमिका घेतली आहे का ?इतकी शासकीय कार्यालय असताना शौचालय का उभारले नाही? अशी विचारणा ग्रामपंचायती विभागाला गटविकास अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कधी केली आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
⁰ परळी ग्रामपंचायत तिने आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात परळी येथे विविध कामांसाठी आम्हाला यावे लागते आमच्याबरोबरच विद्यार्थिनी तसेच बाहेरील पर्यटक ही येत असतात यांना मूलभूत सुविधा म्हणजेच स्वच्छतागृह सार्वजनिक पाणपोई नसल्यामुळे त्यांची कुचंबना होते सदर बाब गंभीरतेणे लक्षात घेऊन परळी ग्रामपंचायत तसेच आजीमाजी सदस्य ग्रामस्थ यांनी लवकरात लवकर सदर प्रश्नाचा पाठपुरावा करावा अशी मागणी स्थानिक नागरिक पर्यटक यांचेकडून होत आहे
Comments
Post a Comment