महू धरण गच्च भरले, कुडाळी नदी.
महू धरण गच्च भरले, कुडाळी नदी.
.jpeg)
भिलार:महू धरण पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागले असून कुडाळी नदीकाठील सर्व रहिवाशी ग्रामस्थाना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरनाकडून..तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गावो गावचे सरपंच, ग्रामसेवक तलाठी यांना कळविण्यात येत आहे.त्यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे..नदीपात्रात प्रवेश न करण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडूच नये असे आदेश देण्यात आले आहे. महू धारणाचे काम 95% पूर्ण झालेले असून सद्य स्थितीत कालव्याची कामे अपूर्ण आहे. दरवर्षी पावसाळ्यात फक्त पाणी आडवलं जायचं ह्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, कृष्णा पाटबंधारे विभाग कार्यालयाकडून महू धारणाचे पाणी कालव्यात सोडण्यात आले.
Comments
Post a Comment