Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

परळी बस स्थानक की मद्यपिंचा अड्डा.

 परळी बस स्थानक की मद्यपिंचा अड्डा.








-------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

परळी सज्जनगड प्रतिनिधी

 नितीन कुंभार 

-------------------------------------

परळी :बस स्थानक परिसरातच रोज सुरू असते गटारी.

 किल्ले सज्जनगड च्या पायथ्याशी असलेल्या परळी म्हटलं की सर्वांना साठगाव परळी नजरेसमोर येते या ठिकाणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला बाजारासाठी औषध उपचारासाठी बँकेसाठी शाळा कॉलेज साठी येत असतात मात्र भर बाजारपेठेत असलेल्या बस स्थानकातच दिवसभर मद्यपिंचा धिंगाणा सुरू असतो यामुळे हा परिसर जणू मद्यपींचा अड्डा आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दारू ढोसून अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे तसेच बस स्थानकात रोज दारू पिऊन भांडणे करणे हा प्रकार राजरोस सुरू झाल्यामुळे या परिसरात व्यवसाय करीत असलेले व्यवसायिक महिला यांनाही आता असुरक्षित वाटू लागले आहे.

परळी म्हटलं की सर्वांसमोर सज्जनगड (रामाची परळी) लांबून येणारे भाविक परळी येथील ऐतिहासिक महादेव मंदिर परळी सज्जनगड पायरी मार्ग तसेच काडसिद्धेश्वर मठ या ठिकाणी आवर्जून भेटी द्यायला येत असतात. मात्र येथील वातावरण पाहून हीच का सज्जनगड परळी ?

असे म्हणत आहेत . महिलावर्ग, कॉलेजचे विद्यार्थिनी बस स्थानकात उभे राहण्याची घाबरत आहेत बस स्थानकात असलेली अस्वच्छता तिथे असलेले दारूच्या बाटल्या प्लॅस्टिकचे ग्लास यामुळे हा जणू दारुड्यांचा अड्डाच आहे की काय असे चित्र दिसत आहे.

बस स्थानकाच्या बाजूलाच प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारपेठ पोलीस स्टेशन, पोस्ट कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र, अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत यामुळे हा परिसर नेहमी वर्दळीचा असतो मात्र या मद्यपींना आवर कोण घालणार? असा प्रश्न सर्वांसमोर असतो. येना जाणारे केळवली धबधबा ला जाणारे पर्यटक हुल्लडबाज यांचाही वावर सध्या या परिसरात वाढला असून तेही रस्त्यावर उभे राहूनच गोंधळ घालत असतात.

Post a Comment

0 Comments