परळी पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा परळीचे पोलीस स्टेशन शो पीस.

 परळी पोलीस स्टेशन असून अडचण नसून खोळंबा परळीचे पोलीस स्टेशन शो पीस.








------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

परळी सज्जनगड प्रतिनिधी

नितीन कुंभार  

------------------------------------

परळी :सातारा तालुक्यातील परळी येथे या परिसरातील गावांमधील तंटे वाद-विवाद जाग्यावरच नीपटारा व्हावा म्हणून परळी आऊट पोस्ट उभारण्यात आले. आहे परळी हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून या परिसरामध्ये अनेक बाहेरचे लोक येत असतात मात्र अशा ठिकाणी पोलीस पाटील हे पद ही गेले कित्येक वर्षापासून रिक्तच आहे .कारण या इमारतीचे कुलूप दोन दोन महिने उघडले ही जात नाही. पोलीस स्टेशनची इमारत सध्या एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे झाली आहे या परिसराला गवत व झाडाझुडपांचा विळखा पडला पोलीस स्टेशन म्हणजे निवारा केंद्र असल्याप्रमाणे या ठिकाणी लोक येऊन बसलेले असतात.

अशी दयनीय अवस्था आहे .

सध्या या परिसरामध्ये पर्यटकांबरोबरच हुल्लडबाजीचे प्रमाणही वाढले आहे याचबरोबर या परिसरात सध्या हॉटेलिंगचे प्रमाण वाढले आहे तसेच देशी विदेशी दारू दुकान बियर बार सुरू झाल्यामुळे या परिसरातील मद्यपींचा धाबड दंगा वाढला आहे यावर अंकुश ठेवण्यासाठी हे पोलीस स्टेशन कार्यरत असणे गरजेचे आहे.

परळी येथे मध्यवर्ती ठिकाणी परळी पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे. परळी पंचक्रोशीतील वादविवाद तंटे हे जाग्यावरच मिटवले जावेत येथील स्थानिक ग्रामस्थांना तालुक्याला जाण्याची गरज भासू नये हे उद्दिष्ट होते मात्र हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. कोणताही अनुचित प्रकार किंवा काही दुर्घटना वाद-विवाद झाल्यावर या भागातील लोकांना तालुका पोलीस स्टेशनला बोलावले जाते.

या ठिकाणी कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी कधीही उपस्थित नसतात त्यामुळे हा परिसर सध्या अशांत होऊ लागला आहे. ठोसेघर उरमोडी धरण

केळवली धबधबा या मार्गावर दिवसभर मद्यपींचा तसेच हुल्लड वाजांचा दंगा सुरू असतो त्यामुळे येथील शांतता लोप पावली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.