स्व. माणिक पोदार लर्न स्कूल मध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी संपन्न..
स्व. माणिक पोदार लर्न स्कूल मध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी संपन्न..
-------------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकूर
-------------------------------------------
दि.28 जुलै 2023 रोजी स्व. माणिक पोदार लर्न स्कूल मध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी हा कार्यक्रम शाळेच्या परिसरात मोठ्या उत्साहाने पार पडला. विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाबरोबर शिस्त, वक्ताशीरपणा या गुणांची जोपासना होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव तर प्रमुख पाहुण्यामध्ये पी. एस. आय पोलीस स्टेशन रिसोड च्या शिल्पा सुरघडे मॅडम, सचिन मापारी, सीमा मापारी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व माणिकराव जाधव यांच्या प्रतिमेची पूजन करून हारार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये शाळेचे प्राचार्य शाळेच्या ध्वजाचे अनावरण करून या दिनाच्या निमित्ताने शाळेचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सोबत शाळेचे मुख्य विभाग प्रमुख अमोल शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या हाऊस नुसार सुंदर प्रात्यक्षिके पाहुण्यांसमोर सादरीकरण केले. तसेच पथसंचलन करून सर्वांची मने जिंकली. यासोबतच शाळेचे हेड बॉय हेड गर्ल तसेच इत्यादी मुख्य पदावरील प्रतिनिधींनी आपल्या पदाची शपथ घेऊन येणाऱ्या काळात आपल्या कार्याचीमाहिती दिली.यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅचेस लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सेरेमनी मध्ये शाळेतील विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. हेडबॉय म्हणून अर्जुन सरनाईक, हेड गर्ल म्हणून रिधिमा देशमुख स्पोर्ट कॅप्टन चिराग मापारी,स्पोर्ट व्हॉइस कॅप्टन यश खानझोडे कल्चलर कॅप्टन स्नेहा जमधाडे कल्चलर व्हॉइस कॅप्टन श्रीया हवा डिसिप्लिन कॅप्टन वैष्णव मोरे डिसिप्लिन व्हॉइस कॅप्टन अनिरुद्ध बेंगाळ तसेच शाळेतील हाऊस नुसार सुद्धा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ए्कवा हाऊस कॅप्टन अथर्व गोरे ए्कवा हाऊस व्हॉइस कॅप्टन अदिती मोरे इगनीस हाऊस कॅप्टन कार्तिक जेथलिया इगनीस हाऊस व्हॉइस श्रावणी साखरे टेरा हाऊस कॅप्टन वेदांत अंबाडकर टेरा हाऊस व्हॉइस कॅप्टन श्रेया नरवाडे व्हेंटस हाऊस कॅप्टन तनुश्री कावरखे व्हेंटस हाऊस व्हॉइस कॅप्टन दर्शन बनसोड. यांची शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन निवड करण्यात आली. शाळेच्या प्राचार्य बस्वराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पी. एस. आय पोलीस स्टेशन रिसोड च्या शिल्पा सुरघडे मॅडम यांनी विदयार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील विद्यार्थी शोर्य जिरवणकर व तेजल छीत्तरका यांनी केले व आभार प्रदर्शन तनुश्री नांगरे हिने केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment