लाचलुचपत विभागाची इमारत स्वतंत्र प्रशस्त, 9 गुंठयामधे निवासस्थानाची तरतूद.
लाचलुचपत विभागाची इमारत स्वतंत्र प्रशस्त, 9 गुंठयामधे निवासस्थानाची तरतूद.
सातारा येथील लाचलुचपत विभागाची सध्या अस्तित्वात असलेली इमारत साठ वर्षं जुनी आहे. या इमारतीला वारंवार दुरुस्ती करावी लागते. कायमस्वरूपी प्रशासकीय इमारत असणे आवश्यक आहे यासाठी पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य यांनी याबाबत प्रस्ताव फेब्रुवारी 2023मधे तयार करून तो लाचलुचपत विभागाच्या पुणे अधिक्षक येथे पाठवला. तेथुन पुढे लाचलुचपत विभागाच्या पोलिस महासंचालक व मुंबई पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात पाठविण्यात आला. सातारा जिल्हा न्यायालयासमोर एसीबीच्या मालकीची 9 गुंठे जागा उपलब्ध असुन अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहती साठी प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. एसीबीच्या या प्रस्तावाची कार्यवाही तातडीने होणार आहे. नव्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव असा आहे की, तीन मजली इमारत असावी, त्या मध्ये तीन पोलिस अधिकारी यांना स्वंतत्र केबिन, प्रत्येक पोलिस कर्मचारी यांना स्वंतत्र टेबल, प्रशिक्षण तसेच मेळावा यासाठी स्वतंत्र मोठा हाॅल, आडीओ रूम, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, संशयितांना पकडल्यावर त्यांना ठेवण्यासाठी वेगळी रूम, पार्कींग, लहान गार्डन, तसेच पोलिस वसाहतीत पोलिस अधिकारी यांना प्रशस्त घरासह कर्मचारी यांना वन बी एच के पद्धतीने घरे असावी, सध्या सातारा एसीबीच्या कार्यालयात तीन अधिकारी व सोळा कर्मचारी आहेत. सध्या एसीबीच्या नावावर जागा असलेली जागा 2012मधे शिक्कामोर्तब झाली आहे. एसीबीचे तत्कालीन उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एन. रामास्वामी यांच्या कडे प्रस्ताव देवुन पाठपुरावा करून सातबारा नावावर केला. महाराष्ट्रातील एसीबीच्या मालकीची जागा खुप कमी प्रमाणात असुन त्यापैकी एक सातारा जिल्हा आहे. पुर्वी ही जागा भुसंपादन, सैनिक कल्याण विभागाकडे होती. त्यानंतर तीस वर्षांनंतर ही जागा एसीबीकडे ताब्यात आली. पोलिस उप अधीक्षक उज्वल वैद्य यांनी जानेवारी 2023 या विभागाचा कार्यभार स्वीकारला.व सहा महिन्यांत एसीबीकडे दोन बोलोरो वाहने, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे पाठपुरावा करून डीपीडीसी मधुन मान्यता मिळविली आहे. याशिवाय जंबो झेरॉक्स मशीन,तीन प्रिंटर, चार लॅपटॉप,अशी यंत्रणाही शासनाकडून मिळविली आहे. ही यंत्रणा तेहतीस लाख रुपयांची आहे.
Comments
Post a Comment