सिध्दनेर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.
सिध्दनेर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.
सिध्दनेर्ली प्रतिनिधी
----------------------------------
सिध्दनेर्ली ता.कागल येथे व्हीजन स्प्रिंग दिल्ली, अनंतशांती सेवाभावी संस्था,समाज विकास केंद्र सिध्दनेर्ली व निसर्ग व पर्यावरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमात १२५ जणांनी नोंदणी करत उस्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये १२५ जणांची मोफत नेत्र तपासणी झाली.या शिबिराची सुरूवात सिध्दनेर्ली येथील डॉक्टर असोशिएशनच्या वतीने दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रास्ताविक निसर्ग पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मा.मधुकर येवलुजे यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष समाज विकास केंद्राचे कॉम्रेड शिवाजीराव मगदूम होते. डॉक्टर असोशिएशनच्या वतीने डॉ.सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरासाठी श्री. आण्णासाहेब पाटील (तारदाळे),संजय येवलुजे, लक्ष्मण गुरव,शंकर चंदर पाटील, दिपक माने,सौरभ माने,पवन पोवार यांच्या हस्ते चष्मे वाटप झाले तर सौरभ माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉक्टर असोशिएशनचे मा.नामदेव पाटील,सुधाकर पाटील, प्रविण पाटील,अमोल लोहार,स्वप्नील मगदूम,सुधाकर पोवार,अरूण पोवार यांच्या सह टीम व्हिजन स्प्रिंग उपस्थित होते.
Comments
Post a Comment