शाळा, महाविद्यालय च्या वेळेनुसार एस टी चे नियोजन करण्याची मागणी.
शाळा, महाविद्यालय च्या वेळेनुसार एस टी चे नियोजन करण्याची मागणी.
परळी :परळी, ठोसेघर, पाटेघर, केळवली, सज्जनगड, तसेच आजू बाजूच्या वाढी वस्तीतील शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयाच्या वेळेनुसार या परिसरात एसटी चे नियोजन करावे या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सातारा विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांना देण्यात आले शाळा व महाविदयालयच्या वेळेनुसार एसटी चे नियोजन नसल्याने विध्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन नाहक त्रास होतो त्यामुळे शाळेच्या वेळेनुसार एसटी चे नियोजन करावे असे निवेदणात म्हटले आहे यावेळी महेश जाधव, समाधान शेळके, सुधीर जाधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment