सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत केसपेपरला तांत्रिक अडचण सांगुन पैशाची मागणी, सिव्हिल सर्जन डॉ सोनवणे लक्ष घाला.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत केसपेपरला तांत्रिक अडचण सांगुन पैशाची मागणी, सिव्हिल सर्जन डॉ सोनवणे लक्ष घाला.
सध्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना साहेब पाटील रुग्णालयात मोफत केसपेपर मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या रुग्णांना सवलतीस पात्र असूनही पैशाची मागणी केली जात आहे. ते न दिल्यास अनिश्चित काळासाठी थांबावे लागेल असे सांगितले जाते. त्यामुळे शासनाच्या सुविधेचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांना ही बाब माहिती नाही का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत तातडीने लक्ष घालून मार्ग काढणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारो रूग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णालयात आल्यावर त्यांना तातडीने केसपेपर उपलब्ध होणे आवश्यक आहे.,तरच वेळेत डॉक्टरांना दआखवणू, त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करणे व पुन्हा त्यांना दाखवून सल्ला व औषध घेणे आवश्यक असते. नाहीतर सायंकाळ किंवा दुसऱ्या दिवसांपर्यंत वाट पहावी लागते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांच्या कालावधीत केसपेपर संगणकीकरण करण्यात आले होते. केसपेपर विभागात तीन संगणक उपलब्ध करून दिल्याने कामकाज चालू आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला केसपेपर क्रमांक मिळत होता. हा मिळालेला क्रमांक त्या रुग्णाला आयुष्यभरासाठी असणार होता. हा प्रश्न मार्गी लागल्यावर संगणीकृत पेपर पुन्हा सुरू झाले. परंतु सर्व्हरमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तीही केवळ मोफत केसपेपरसाठी पात्र असलेल्या रुग्णांसाठी. सर्व्हरची अडचण सांगुन केसपेपरसाठी पैशाची मागणी केली जात आहे तरीही वरिष्ठांचे लक्ष नाही. शासनाने ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना,एक ते दहा वयोगटातील बालक, पत्रकार अशा विविध व्यक्तींना मोफत केसपेपरसाठी सवलत दिली जाते. त्यामुळे पैसे मागितले जातील अशी अपेक्षाच नसते. पैसे नसतील तर ठिक होईपर्यंत थांबावे लागेल असे सांगितले जात आहे. त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे. कोणताही बिघाड झाल्यास अॉफलाईन पद्धतीने केसपेपर देतायेतील यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment