बिंदू चौक परिसरातील वीस पाणी मीटर चोरीला ! चोरीची घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद.
बिंदू चौक परिसरातील वीस पाणी मीटर चोरीला ! चोरीची घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद.
-----------------------------------------------------------------------------
कोल्हापूर (प्रतिनिधी अन्सार मुल्ला:- काल रात्री लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे हद्दीतील आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक बिंदू चौका जवळील आझाद गल्ली परिसरातील तब्बल वीस पाणी मीटर चोरट्यांनी चोरले.
सदरची धक्कादाय घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेरात कैद झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि पोलिसांची तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या आजाद गल्लीतील पाणी मीटर चोरी झाले आहेत. सदरच्या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार येथील नागरिकांची आधीच पाण्या वाचून भटकंती सुरू असताना, आता चोरट्यांनी पाणी मीटरवर डल्ला मारल्याने येथील नागरिकांची सकाळ अतिशय त्रासदायक ठरली. पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर काही वेळानंतर पोलीस घटना स्थळी आले. मात्र अशा भुरट्या चोरांनी पोलिसांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरी करून खुले आव्हानच दिले आहे. सदरच्या चोरांचा आणि असल्या घटनांचा पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे असा सूर नागरिकाकडून उमटत आहे.
Comments
Post a Comment