कायदेविषयक ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवा: गीता पाटील.

 कायदेविषयक ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवा: गीता पाटील.

गांधीनगरात:- विद्यार्थ्यांनी आपल्या संरक्षणार्थ असणारे कायदेविषयकचे ज्ञान आत्मसात करून स्वतःला सक्षम करण्याची गरज आहे. असे मत करवीर विभाग  निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षका गीता पाटील यांनी केले. त्या गांधीनगर  येथे संत शांतीप्रकाश हायस्कूल व इंग्लिश मीडियम शाळेत आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. शाळेचे व्हाईस चेअरमन अनिल तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपनिरीक्षक गीता पाटील यांनी  सक्षम शाळा, सुदृढ शाळा, पोक्सो कायदा, सायबर कायदे, मोटर वाहन कायदे, निर्भया पथकाचे कामकाज, स्वरक्षणासाठी असणारी हेल्पलाइन नंबर, तक्रार पेटी, सोशल मीडियाचा वापर तसेच हुल्लडबाज टवाळखोर, मुलांकडून होणाऱ्या त्रासापासून  घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा यावरील कोणतेही तक्रारी विषयी निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन गीता पाटील यांनी केले. यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षका जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक फौजदार नाझनीन देसाई, पो काँ. प्रियांका कुंभार, स्मिता जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका  मीता नाडगोंडा, सुलभा मजली, शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी या संख्येने उपस्थित होते.गांधीनगर येथील स्वामी शांति प्रकाश हायस्कूल मध्ये करवीरच्या निर्भया पथकाकडून विद्यार्थी विद्यार्थिनींना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक गीता पाटील., अनिल तनवाणी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.