विठ्ठलवाडी देवस्थान भक्तांच्या गर्दीने फुलले.
विठ्ठलवाडी देवस्थान भक्तांच्या गर्दीने फुलले.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.
पुणे प्रतिनिधी
------------------------------------
पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गापासून जवळच इंदापूर तालुक्यातील पाच गावांच्या सीमेवर असलेले, पंढरपूरप्रमाणेच श्री विठ्ठल- रुक्मिणी या देवतांची मूर्ती स्वयंभू असलेले कळस सई येथील क्षेत्र विठ्ठलवाडी देवस्थान हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. भोवताली रमणीय वातावरण तसेच वन विभागाचे क्षेत्र असल्याने, वन्य प्राणी व पशुपक्षी या भागात वावरताना दिसतात.उजनी जलाशयाजवळ असल्याने पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत आहे. महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला नेहमीच गर्दी झालेली दिसते, अखंड अन्नदान व धार्मिक उपक्रम गेल्या ४१ वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहेत. हा परिसर उजनी धरणाच्या जवळ असल्याने शांत व रम्य ठिकाण असल्याने, वन्य प्राणी हरणे, ससे तसेच मोर व इतर पशुपक्षी या भागात वावरताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाला परंपरा आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याठिकाणी राहण्यासाठी खोल्या बांधुन सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी परिसरातील वारकरी मंडळी दररोज मुक्कामी असतात. त्यांना अन्नदान तसेच कपडे व मानधन व इतर सुविधा देवस्थानच्या वतीने पुरवण्यात येतात. या ठिकाणी अल्प दरामध्ये विवाह संपन्न व्हावेत म्हणून अद्ययावत मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. बाराही महिने हे मंगलकार्यालय धार्मिक तसेच कौटुंबिक कार्यासाठी उपलब्ध असते. रोज येथील मंदिरात सकाळी काकडा, दुपारी भजन, संध्याकाळी हरिपाठ व प्रत्येक एकादशीच्या वेळी कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात व याच ठिकाणी मोठे अन्नदान करण्यात येते. हजारो वारकरी भक्तगण दर्शनासाठी सातत्याने येत असल्यामुळे धाकटे पंढरपूर म्हणून या भागाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Post a Comment