श्रीपाद जाधव सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी.
श्रीपाद जाधव सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी.
सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांची सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग वाई येथे उप अभियंता म्हणून कार्यरत असताना श्रीपाद जाधव यांची आकटोबर महिन्यात पदोन्नतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता पदी बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद मध्ये बदल्यांचे वारे वाहू लागले होते. श्रीपाद जाधव यांनीही विनंती बदलीसाठी मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा येथे श्रीपाद जाधव यांची बदली झाली आहे.याचबरोबर कुंडल विकास,प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल तालुका पलुस येथील सहयोगी प्राध्यापक अविनाश देशमुख यांचीही सातारा जिल्हा परिषदेच्या उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर बदली झाली आहे.
Comments
Post a Comment