धर्म निरपेक्ष देश असाच अखंड राहो - प्रा. आनंद साठे सर.
धर्म निरपेक्ष देश असाच अखंड राहो - प्रा. आनंद साठे सर.
भारत हि एक संताची भूमि आहे या देशात सर्व जातीचे लोक गुणा गोविंदाने राहतात . काही किरकोळ जाती भेद असले तरी बंधूभावाने एकमेकांसाठी आप - आपसात मिटवून घेतात . सर्व सण साजरे करण्याचे हि एक परंपरा आहे . त्याच निमित्त साधून मी लेख लिहित आहे.सपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरचा - विठू - पाडूरंग - रुखमाई .महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी . या उत्सवा निमित्त दरवर्षी वारकरी आषाढी एकदशी निमित्ताने एकत्र येतात पण ह्या वर्षी योगा योग्य म्हणावा.मुस्लिम समाजाचा मोठा उत्सव म्हणजे बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवसी आले त्या निमिताने ऐक्याचे क्षण अनुभवायाला मिळाले .मांसाहार अन पशुहत्येचा गाजावाजा केला तर त्यांनी कुणीही न सागता बळी न देण्याचा फतवा काढला आणि सातारा जिल्ह्यांत सर्व मुस्लिम जमातानी आणि सघटनानी कुर्बान न करण्याचा विचार करून तसे ज्या त्या पोलिस ठाण्याला तसे निवेदन दिले ईद नतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बान करण्याचा बेत आखला आणि हिन्दू धर्माच्या आषाढी एकादशी चा आदर राखला व हिन्दूच्या भावनेचा आदर केला .हिन्दूनी मंदिरात विठू नामाचा गजर केला व मुस्लिम समाजाने मशीदीत नमाज आदा केला .त्यामुळे कालचा आषाढी एकदशी व बकरी ईद हया दिवशी समतेचे अन ऐकात्मतेच दर्शन घडलं
जाती अन धर्माच्या नावाने राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं
येथून पुढे येणारे दोन्ही धर्माचे सणसुदी दरवर्षी एकाच दिवशी येवोत .
जगतगुरु संत तुकोबारायांच्या अभागात एक ओवी आहे,
अल्ला देवे अल्ला दिलावे ! अल्ला दवा अल्ला खिलावे
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये!!
या अभंगाच्या ओळी सत्यात येवोत .
विठ्ठ + अल्ला र् विठ्ठल आणि अल्लाचा हा गजर सार्या आसंतात जावो .
आम्हा सर्वाच्या मनातील हा धर्मनिरपेक्ष देश असाच अखंड राहो .
प्रा.आनंद साठे
राज्य सहसचिव
प्रगतीशील लेखक संघ सर यांनी मत व्यक्त केले आहे .
Comments
Post a Comment